मुंबई सुन्न! बलात्कार पीडितेची मृत्युशी झुंज संपली; डॉक्टरांचे प्रयत्न ठरले अपयशी

मुंबई तक

• 08:36 AM • 11 Sep 2021

साकीनाका येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणातील पीडितेची झुंज अखेर संपली. नराधमाने बलात्कारानंतर केलेल्या क्रूर अत्याचारानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महिलेला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असताना महिलेची प्राणज्योत मालवली. दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या बलात्काराच्या घटनेनं शुक्रवारी मुंबई हादरली. मुंबईतील साकीनाका भागात एका महिलेवर अत्याचार करण्यात आले. साकीनाका भागातील खैराणी रोडवर ३० वर्षीय […]

Mumbaitak
follow google news

साकीनाका येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणातील पीडितेची झुंज अखेर संपली. नराधमाने बलात्कारानंतर केलेल्या क्रूर अत्याचारानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. महिलेला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असताना महिलेची प्राणज्योत मालवली.

हे वाचलं का?

दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या बलात्काराच्या घटनेनं शुक्रवारी मुंबई हादरली. मुंबईतील साकीनाका भागात एका महिलेवर अत्याचार करण्यात आले. साकीनाका भागातील खैराणी रोडवर ३० वर्षीय महिलेवर आधी बलात्कार करण्या आला. त्यानंतर तिच्यावर गुप्तांगात लोखंडी रॉड टाकल्याचा क्रूर प्रकारही नराधमाने केला होता. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केलं होतं. तर आरोपी मोहित चौहाणला बेड्या ठोकल्या होत्या.

दरम्यान, पीडित महिलेला गंभीर अवस्थेत मुंबईतील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गुप्तांगात रॉड घालण्यात आल्यानं महिलेची प्रकृती गंभीर होती. मात्र, डॉक्टरांनी तातडीने महिलेवर ऑपरेशन केलं. शुक्रवारी तब्बल दोन ते तीन तास ऑपरेशन सुरू होतं. त्यानंतर महिलेच्या प्रकृती सुधारण्याकडे डॉक्टराचं लक्ष लागलं होतं. मात्र, उपचारादरम्यान महिलेनं अखेरचा श्वास घेतला.

घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आलं समोर…

साकीनाका बलात्कार प्रकरणातील सीसीटीव्ही फूटेज समोर आलं आहे. या फूटेजमध्ये आरोपींने महिलेवर बलात्कार करून क्रूर अत्याचार केल्याचं दिसत आहे. आरोपीनं बलात्कार केल्यानंतर महिलेच्या गुप्तांगात अनेक वेळा रॉड टाकण्याचा क्रूर आणि संतापजनक प्रकार केला. महिला अत्यवस्थ झाल्यानंतर आरोपीनं पीडितेला टेम्पो टाकून दिलं आणि फरार झाला. हे सगळं सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले…

‘मुंबईतील साकीनाका येथे झालेली बलात्काराची घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. सध्या पीडीतेवर उपचार सुरू (गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली, तेव्हा महिलेवर उपचार सुरू होते.) असून, पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल’, असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी स्पष्ट केलं.

लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेताना

‘साकीनाका पीडितेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला… कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही, पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणं देणं नाही. त्यांच्यासाठी तूझा मृत्यू म्हणजे फक्त अजून एक नंबर. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेतांना… नाही वाचवू शकलो तुला’, अशी खंत व्यक्त करत भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सरकावर निशाणा साधला.

    follow whatsapp