Crime : ‘बेस्ट फ्रेंडनेच’ केला विश्वासघात! मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

मुंबई तक

24 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:46 AM)

मुंबई : जवळच्या मित्रानेच विश्वासघात करत इतर मित्रांच्या सहाय्याने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. लोअर परेलमधील एनएम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली असून या प्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यातील तीन जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : जवळच्या मित्रानेच विश्वासघात करत इतर मित्रांच्या सहाय्याने एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. लोअर परेलमधील एनएम जोशी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली असून या प्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यातील तीन जण अल्पवयीन असल्याची माहिती आहे.

हे वाचलं का?

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अटक केलेल्या ३ अल्पवयीन मुलांपैकी एक जण पिडीत मुलीचा जवळचा मित्र होता. याच मित्राने पीडितेला एका मित्राच्या घरी नेलं जिथं इतर मित्रांच्या सहाय्याने तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आला. यानंतर पीडितेने ही बाब घरच्यांना सांगितली. घटना ऐकताच कुटुंबियांनी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहा आरोपींना अटक केली आहे.

दरम्यान, पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना डोंगरी भागातील बालसुधारगृहात पाठविण्यात आलं आहे. तर उर्वरित ३ संशयितांविरोधात एनएम जोशी मार्ग पोलिसांनी आयपीसीच्या कलम 376 (डी) (2) (एन), 34 आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 4, 5, 6, 8, 10, 12, 17 नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यांना न्यायालयात हजर केलं असता ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, याच महिन्यात मुंबईतून आणखी एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची बातमी समोर आली होती. एका ४२ वर्षीय महिलेवर तिघांनी घरात घुसून सामूहिक बलात्काराची घटना घडली होती. यावेळी आरोपींनी अमानुषतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. बलात्कारानंतर महिलेवर धारदार शस्त्राने वार केले होते आणि सिगारेटने प्रायव्हेट पार्टही जाळले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून आरोपीचा शोध सुरू आहे.

    follow whatsapp