ADVERTISEMENT
राज्यात मुंबईसह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता महापालिका प्रशासनाने होळी सण साजरा न करण्याचं आवाहन केलं होतं. होळी खेळत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन होत नाही…त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असले. होळीच्या दोन ते तीन दिवस आधी महापालिकेने यासंदर्भातले आदेश जाहीर केले होते.
नियमांचा भंग करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करुन दंड ठोठावण्यात येईल असंही महापालिकेने जाहीर केलं होतं.
परंतू मुंबईतल्या अनेक भागांमध्ये आज नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसलं.
एकमेकांना रंगात आणि पाण्यात भिजवताना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसत होतं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण साजरा करायचा की नाही याबद्दल अनेकांच्या मनात शंका होती. परंतू प्रत्यक्षात अनेक मुंबईकर रस्त्यावर उतरुन होळी खेळताना दिसत होते.
आपल्या मित्रांना रंगात न्हाऊन काढताना एक मुंबईकर…
चाळ, सोसायटीच्या आवारात, रस्त्यांवर आपल्या मित्रांना रंगात न्हाऊन काढण्यासाठी चालेली धडपड
वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर होळीचा सण साजरा करत असताना नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन महापालिका प्रशासनाने केलं होतं. परंतू या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये.
मुंबईसह अनेक महत्वाच्या शहरांमध्ये नागरिकांकडून होणारं नियमांचं उल्लंघन लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला लॉकडाउनची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत.
ADVERTISEMENT