ADVERTISEMENT
मुंबईत आज मोठ्या भक्तीभावाने सार्वजनिक मंडळाच्या गणेशमुर्तींसह घरगुती गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं.
मुंबईतला प्रसिद्ध गणपती लालबागचा राजा ची मिरवणूकही यंदा वेळेत पार पडली.
यंदा लालबागच्या राजाची मूर्ती ही ४ फुटांची बसवण्यात आली होती. मिरवणूक सोहळाही कोरोनाचे सर्व नियम पाळून पूर्ण करण्यात आला.
विसर्जनासाठी सर्व चौपाट्यांवर आणि समुद्रकिनारी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यंदाच्या संपूर्ण गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट होतं. त्यामुळे विसर्जन मिरवणूकीला फारशी गर्दी दिसली नाही.
राज्यासह देशावरचं कोरोनाचं सावट दूर कर अशी मागणी यावेळी भक्तांनी लालबागच्या राजाच्या चरणी केली.
बाप्पानेही आपल्या भक्तांना मी पुढच्या वर्षी पुन्हा येईन असं आश्वासन देत त्यांचा निरोप घेतला आहे.
ADVERTISEMENT