नागपूरच्या लोहमार्ग पोलिसांनी चार मोबाईल चोरट्यांच्या टोळीला अटक केली असून त्यांच्याकडून १४ चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. धक्कादायक गोष्ट म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रियांशु क्षेत्री नामक फुटबॉलपटू-अभिनेत्याचा समावेश आहे. प्रियांशुने नुकतच अमिताभ बच्चन यांच्या झुंड या सिनेमात काम केलं आहे.
ADVERTISEMENT
मौजमस्ती करण्यासाठी पैसे अपुरे पडत असल्यामुळे ही टोळी मोबाईल चोरायची अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “नागपूर रेल्वे स्टेशनच्या आधी आऊटर वर उभ्या असलेल्या ट्रेनच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातात असलेला मोबाईल हिसकावून पळणाऱ्या टोळीचा शोध गेल्या अनेक दिवसांपासून लोहमार्ग पोलिसांकडून घेतला जात होता. पोलिसांनी सापळा रचून प्रियांशु या आरोपीला अटक केली. त्याच्या चौकशीतून आणखी दोन आरोपींना अटक करुन या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.”
पोलिसांनी या प्रकरणात प्रियांशु क्षेत्री, शुभम जांभुळकर, सतेंद्र यादव या आरोपींना अटक केली आहे. मोबाईल चोरल्यानंतर हे आरोपी कमी भावात विकून त्यातून मिळणाऱ्या पैशांमधून मौजमस्ती करायचे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ADVERTISEMENT