नागपूर पोलिसांनी शहराच्या सीमेवर असलेल्या खापरी गावाजवळ एका महिलेच्या घरावर धाड मारत १२ हजार लिटर पेट्रोल जप्त केले आहे. या महिलेने आपल्या घरी एका प्रकारे मिनी पेट्रोल पंपच तयार केला होता. पोलिसांनी या प्रकरणात महिलेसह तीन आरोपींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
मीना द्विवेदी असं या आरोपी महिलेचं नाव असून तिच्या घरात २५ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पेट्रोल पंपावरील टँकरमधून पेट्रोल चोरी करत ही महिला आपल्या घरी मोठमोठ्या कॅनमध्ये साठवून ठेवायची. बेलतरोडी पोलिसांना याबद्दल माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी छापा मारत आरोपींना अटक केली आहे.
पेट्रोल पंपावरचं पेट्रोल चोरल्यानंतर ही महिला आपल्या साथीदारांच्या मदतीने यात रॉकेल आणि इतर पदार्थ मिसळायची. बाहेर पेट्रोल ११० रुपये लिटर दराने मिळत असताना ही महिला भेसळ केलेलं पेट्रोल आपल्या साथीदारांच्या सहाय्याने ७७ रुपयाने विकायची.
अशी केली जाते पेट्रोलची चोरी –
पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासानुसार वर्धा जिल्ह्यातील “पुलगाव” तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील “ताडाली” मधून इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या डेपो मधून निघणारे टॅंकर्स वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यात काही विशिष्ट ठिकाणी थांबतात. तिथे टँकर चालक काहीशे लिटर पेट्रोल काढून चोरीचा पेट्रोल विकणाऱ्या टोळीच्या हवाली करतात. 22 लिटर ची एक कॅन बाराशे ते पंधराशे रुपये मध्ये या टोळीला विकली जाते. पुढे ही टोळी तीच कॅन सतराशे अठराशे रुपयात विकते. मात्र, ही चोरी करताना पेट्रोलियम कंपनीची टँकरवर बसवलेली दुहेरी सुरक्षा व्यवस्था अचूकपणे निकामी केली जाते. परंतू या महिलेला अटक केल्यामुळे मोठं रॅकेट उध्वस्त करण्यात नागपूर पोलिसांना यश आलं आहे.
जुन्नर-आळेफाटा येथे बंदुकीचा धाक दाखवून दरोडा, रोख रक्कम पळवली
ADVERTISEMENT