पोलिसांची धाड पडल्यानंतर डान्सबारमध्ये धावपळ उडाली, असं तुम्ही बातम्यांमधून वाचलं असेल, पण नागपूर पोलिसांनी टाकलेल्या धाडीवेळी वेगळंच घडलं. गुन्हेगारी घटनांमुळे सातत्यानं चर्चेत असलेल्या नागपूरमध्ये एक वेगळीच घटना घडली. गझल वाजवून बार चालवणाऱ्या बारमध्ये मूळात वरून कीर्तन आणि आतून तमाशा असाच प्रकार सुरू होता. पोलिसांना याची माहिती मिळाली आणि बिंग फुटलं.
ADVERTISEMENT
झालं असं की, नागपूरमधील हिंगणा परिसरातील मोंढा येथे आदित्य बार अॅण्ड रेस्तराँ नावाचं हॉटेल आहे. याच ठिकाणी गझल वाजवण्याच्या नावाखाली डान्सबार चालवला जात होता. अनेक दिवसांपासून हे सुरू होतं.
अंधेरीतील दीपा बारचा अखेर पर्दाफाश; 17 बारबालांना लपवलं होतं भिंतीतील भुयारात
मोंढा येथे सुरू असलेल्या आदित्य बार अँड रेस्तराँ मधील डान्सबारची कुणकुण सुरू होती. दरम्यान, ही माहितील पोलिसांना मिळाली. त्या आधारावर गुन्हे शाखेचे युनिट एकचे पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण आणि त्यांच्या टीमने डान्स बारवर छापा टाकला.
मध्यरात्री पोलिसांची टीमबारमध्ये धडकली. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर बार मालकाने लगेच डान्सबार बंद केला अन् गझल सुरू केली. मात्र, तोपर्यंत उशीर झाला होता.
बार चालकाची चलाखी ओळखत पोलिसांनी बारच्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर जप्त केला. डीव्हीआरमधून बारमध्ये गझलच्या नावाखाली सुरू असलेला डान्सबार उघड झाला.
तरुणीच्या गळ्यावरून फिरवला चाकू; ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या आधी तरुणाने कुटुंबीयांसमोरच केली हत्या
सीसीटीव्ही डीव्हीआरमध्ये कुख्यात गुंडांसह काही शौकीन बारबालांवर पैशाची उधळण करत असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्या आधारे पोलिसांनी बारचा संचालक निलेश संतोषकुमार सिंग याला अटक केली. तसेच अन्य सात व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत.
ADVERTISEMENT