Nagpur Crime : भाजप नेते मुन्ना यादव यांच्या मुलांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबई तक

22 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 08:33 AM)

FIR against bjp leader Munna yadav sons : भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्ती असलेले मुन्ना यादव (Munna Yadav) यांच्या दोन मुलांविरुद्ध नागपुरातील (Nagpur) प्रतापनगर पोलीस ठाण्यात (police station) शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं असून, गुरुवारी (19 जानेवारी) नागपुरातील छत्रपती नगर […]

Mumbaitak
follow google news

FIR against bjp leader Munna yadav sons : भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे निकटवर्ती असलेले मुन्ना यादव (Munna Yadav) यांच्या दोन मुलांविरुद्ध नागपुरातील (Nagpur) प्रतापनगर पोलीस ठाण्यात (police station) शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

नागपूरमध्ये खासदार क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं असून, गुरुवारी (19 जानेवारी) नागपुरातील छत्रपती नगर येथे खासदार क्रीडा महोत्सव अंतर्गत इलेव्हन स्टार आणि खामला स्टार या दोन्ही संघात क्रिकेटचा सामना खेळवला जात होता. यावेळी मुन्ना यादव यांचा मुलगा करण आणि त्याच्या साथीदारांनी थ्रो बॉलवरून अंपायरच्या निर्णयावर वाद घालण्यास सुरुवात केली.

umesh yadav: क्रिकेटपटू उमेशचे लाखो रुपये हडपले, शैलेश ठाकरेविरुद्ध गुन्हा

अंपायरशी वाद घालत असल्याचं पाहून सामन्याचा स्कोअरर अमित होशिंग याने करणला सामन्याचे नियम सांगितले. त्यानंतर करणने अमितला शिवीगाळ केली. तो तिथेच थांबला नाही, तर अमित होशिंगवर थेट बॅटने हल्ला केला. अचानक घडलेल्या प्रकारामुळे अमित घाबरून पळू लागला, तेव्हा करणने धावत जाऊन पकडलं आणि मारहाण केली.

Nagpur: भयंकर.. महिलेवर कुऱ्हाडीने वार, जखमी अवस्थेत गँगरेप करुन हत्या

या सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान, मुन्ना यादव आणि कुटुंबीय यापूर्वीही दादागिरीच्या घटनांमुळे नागपूर शहरात चर्चेत राहिले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती असलेल्या मुन्ना यादव यांच्या मुलाने क्रीडा महोत्सवात केलेली स्कोअररला केलेल्या मारहाणीची शहरात चर्चा रंगली. या प्रकारानंतर मुन्ना यादव यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष होतं.

मनसेचे पुणे जिल्हाध्यक्ष थिगळेंवर गोळीबार! छातीवर बंदूक ठेवली पण,…

या घटनेचे पडसाद नागपूरच्या राजकारणातही उमटले. त्यानंतर शनिवारी (21 जानेवारी) रात्री नागपुरातील प्रतापनगर पोलीस ठाण्यात कलम 323 नुसार करण आणि अर्जून या दोघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आता या दोघांवर पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

    follow whatsapp