थोरात-पटोले संघर्षात खरगेंची एन्ट्री! थोरातांनी सांगितलं वाद कधी मिटणार?

मुंबई तक

13 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:03 AM)

Nana Patole-Balasaheb Thorat Political Dispute : नाशिक पदवीधर मतदारसंघातून (nashik graduate constituency) सत्यजित तांबेंना (Satyajeet Tambe) उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर काँग्रेसची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. त्यामुळे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला. थोरातांनी थेट विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला. तसेच पटोलेंसोबत काम करण्याबद्दल तक्रारींचा पाढा […]

Mumbaitak
follow google news

Nana Patole-Balasaheb Thorat Political Dispute : नाशिक पदवीधर मतदारसंघातून (nashik graduate constituency) सत्यजित तांबेंना (Satyajeet Tambe) उमेदवारी नाकारण्यात आली. त्यानंतर काँग्रेसची अहमदनगर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली. त्यामुळे बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यातील संघर्ष चव्हाट्यावर आला. थोरातांनी थेट विधिमंडळ गटनेते पदाचा राजीनामा दिला. तसेच पटोलेंसोबत काम करण्याबद्दल तक्रारींचा पाढा पक्षश्रेष्ठींना दिलेल्या पत्रात वाचला. त्यानंतर बाळासाहेब थोरात यांच्याशी मुंबई Tak ने संवाद साधला. (Senior Congress Leader Balasaheb Thorat Interview)

हे वाचलं का?

प्रश्न – एच.के. पाटील डॅमेज कंट्रोलसाठी आलेत, हे जगजाहीर आहे. किती डॅमेज कंट्रोल त्यांनी केलंय?

बाळासाहेब थोरात – नाही. डॅमेज कंट्रोलचा प्रश्नच नाहीये. प्रत्येक पक्षात काहीना काही समस्या असतात. फरक इतकाच आहे की, माध्यमं काँग्रेसला जास्त प्रसिद्धी देतात. यात डॅमेज कंट्रोलचा काही प्रश्न नाही.

प्रश्न – जर असतं, तर तुम्ही राजीनामा दिला नसता. राजीनामा परत घेणार का?

बाळासाहेब थोरात -पक्ष पुढे घेऊन जाण्यासाठी जे जे करावं लागेल, त्यासंदर्भात मी चर्चा केलीये.

प्रश्न – राजीनामा परत घेणार का? कारण मूळ मुद्दा हाच आहे की आपण गटनेते पदाचा राजीनामा दिला. नाराजी, राग मनात असेलच, त्यामुळेच राजीनामा दिला असेल?

बाळासाहेब थोरात – मी जी चर्चा केलीये, ती सांगणं योग्य नाही. ते आमचं अंतर्गत आहे.

प्रश्न – नाना पटोलेंशी तुम्ही चर्चा करणार का? कारण एच.के. पाटील म्हणाले, तुमची समोरासमोर संवाद करून देणार. तुम्ही चर्चा करण्यासाठी तयार आहात का?

बाळासाहेब थोरात – समोरासमोर काय? ते आमच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आहेत.

प्रश्न – ते अध्यक्ष आहेत, पण तुमच्यासारख्या नेत्याने म्हणणं की अपमानित केलं, वारंवार तसं केलं गेलं. मल्लिकार्जून खरगेंना तुम्ही पत्रही लिहिलं?

बाळासाहेब थोरात – तुम्ही तर ते पत्र वाचलं नाही. तुम्हाला हे कुठे मिळालं?

Exclusive: तांबे, पटोले की थोरात… अशोक चव्हाणांनी नेमकं कोणाला सुनावलं?

प्रश्न – पत्र पाठवलं, हे तुम्ही नाकारताहेत का?

बाळासाहेब थोरात – असं नाही. माझी जी खंत होती, ती मी व्यक्त केली.

प्रश्न – त्यावर निदान काय आहे? पक्ष काय कारवाई करणार?

बाळासाहेब थोरात – आता आम्ही मल्लिकार्जून खरगे यांना भेटणार आहोत.

प्रश्न – तुमची तब्येत चांगली दिसत नाहीये, मग तुम्ही रायपूरमधील काँग्रेस अधिवेशनाला जाणार का?

बाळासाहेब थोरात – तब्येत चांगली नाही, तरीही मी अधिवेशनाला जाणार.

प्रश्न – सत्यजित तांबे म्हणताहेत की हे षडयंत्र आहे, सुधीर तांबेंना निलंबित केलं. तुम्हाला काय वाटतं?

बाळासाहेब थोरात – आता हे सगळं सोडून द्या. जे झालं ते झालं. बघू. आता पक्षाला पुढे घेऊन जाऊयात.

Congress वाढवण्यासाठी पाठवलं, तोडण्यासाठी नाही! बड्या नेत्यानं पटोलेंना सुनावलं

प्रश्न – महाराष्ट्रात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशात काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असेल, तर ते महाविकास आघाडीसाठीही चांगलं नाही.

बाळासाहेब थोरात – सगळं काही ठिक होईल.

प्रश्न -तुम्ही चर्चा करणार का?

बाळासाहेब थोरात – चर्चा करण्याबद्दल प्रश्नच नाही. सगळ्यांशी चर्चा करू शकतो.

प्रश्न – राजीनामा परत घेणार का?

बाळासाहेब थोरात – आमचं अंतर्गत आहे. ते मी का सांगू?

प्रश्न – अंतर्गत वादाचा मुद्दा कधीपर्यंत निकाली निघेल?

बाळासाहेब थोरात – मल्लिकार्जून खरगे यांना भेटल्यानंतर सगळं सर्व निकाली निघेल.

    follow whatsapp