काँग्रेस का सोडली होती? प्रफुल्ल पटेलांवर ठपका, नाना पटोलेंचा मोठा स्फोट

मुंबई तक

21 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:14 AM)

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमी मुंबई Takने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना काँग्रेस सोडण्याचं आणि प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर नाना पटोलेंनी काँग्रेस सोडण्यामागची भूमिका स्पष्ट केली. प्रश्न: राहुल गांधींनी तुमची मुद्दाम प्रदेशाध्यक्ष पदी नेमणूक केलेली का?, डिस्टर्बटिव्ह पद्धतीनेच तुम्ही काम करत आहात का? नाना पटोले: मी पूर्वीपासून […]

Mumbaitak
follow google news

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमी मुंबई Takने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना काँग्रेस सोडण्याचं आणि प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच्या भूमिकेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर नाना पटोलेंनी काँग्रेस सोडण्यामागची भूमिका स्पष्ट केली.

हे वाचलं का?

प्रश्न: राहुल गांधींनी तुमची मुद्दाम प्रदेशाध्यक्ष पदी नेमणूक केलेली का?, डिस्टर्बटिव्ह पद्धतीनेच तुम्ही काम करत आहात का?

नाना पटोले: मी पूर्वीपासून काँग्रेस विचारांचा आहे. नाही तर खासदारासारखं पद कोणी सोडत नाही. मी सत्तेसाठी नाही विचारासाठी लढत राहिलोय. मी भाजप खासदार म्हणूनही गेलो तेव्हा मी जनतेच्या प्रश्नावर लढत होतो. सरकारने जेव्हा नोटबंदी आणि जीएसटी आणलं.. जीएसटीवरुन माझं आणि पंतप्रधान मोदींची लढाई झाली जेव्हा त्यांनी सांगितलं की, आम्हाला हेच ठेवायचं आहे त्यांनी घटनात्मक व्यवस्थेला आणि आर्थिक या देशाला डुबविण्याचा जो कायदा पारित करून घेतला त्यावरुन माझा वाद झाला. तिथेच मी खासदारकीचा राजीनामा दिला.

प्रश्न: मुळात तुम्ही काँग्रेस पक्ष का सोडला होता?

नाना पटोले: आमचे आदरणीय प्रफुल पटेल… मी कोणत्या पक्षाला दोष देत नाही. माझा इतिहास हा उघड आहे तो काही लपलेला नाही. मी परवा पण सांगत होतो की, मी काही संस्थानिक किंवा बिल्डर नाही. मी शेतकरीच आहे. मी सामान्य परिवारातील आहे.

मी अजूनही काही हुकूमशाहीकडे गेलेलो नाही आणि जाणार पण नाही. मला संघटनात्मक.. मी किसान काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो. देशभरात किसान संघटनेला मोठी ताकद देशभरात दिली आहे. संघटनात्मक भूमिका एकदम स्पष्ट आहे.

Nana Patole Exclusive : पटोलेंचा राष्ट्रवादीवर संशय… पवारांवर काय म्हणाले?

मी ज्या दिवशी या पदावर आलो त्यावेळी जी बैठक घेतली त्यावेळेसच सांगितलं की, नाना पटोलेची कोणीही व्यक्ती होऊ नका. जो झाला पाहिजे तो काँग्रेसचा झाला पाहिजे. माझ्या ग्रुपचा व्हाव.. माझ्या ग्रुपचा व्हा असं नाही.. आता भाजपमध्ये बघता ना काय सुरू आहे ते.

मी तळागाळातून आलो आहे. या ग्रुपबाजीमुळे पक्षाचं कसं नुकसान होतं आणि जनतेचं कसं नुकसान होतं याची जाणीव मला आहे. म्हणून येणारी पिढी या पद्धतीच्या ग्रुपबाजीमध्ये फसली नाही पाहिजे. ते काँग्रेसच्या विचारांचे तयार झाले पाहिजेत. हा प्रयत्न माझा आहे.

Nana Patole Exclusive: तांबेंचं बंड, काँग्रेसमध्ये भूकंप.. नाना पटोलेंची सडेतोड मुलाखत

मला आता कुठलाही विरोध नाही. मी आजही शेतकरी आहे.. मी काही सोन्याचा चमचा घेऊन जन्मला आलेलो नाही. त्यामुळे सगळ्या गोष्टी मला सोसाव्या लागणार आहेत.

मी तुम्हाला आजच सांगतो की, पुढचं सरकार हे देशात आणि राज्यात काँग्रेसचंच राहील. जे काही केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग केला जात आहे आणि भाजप लोकांना घाबरवत आहे. झाले दोन टर्म झाली आहे. लोकांना काय ते कळलंय. जे भाजपविरोधात लढतील त्यांना आम्ही सोबत घेऊ. तसेच सत्तेच्या वाट्यातही त्यांना आम्ही सामील करून घेऊ.

    follow whatsapp