नांदेड : दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबई तक

• 10:41 AM • 20 Mar 2022

भाऊ कारागृहात असल्याचं सांगून त्याच्या सुटकेसाठी १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक संजय ननवरे आणि सहायक पोलीस निरीक्षक बाळू गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी रामाश्रय सहाने हे १४ मार्चला […]

Mumbaitak
follow google news

भाऊ कारागृहात असल्याचं सांगून त्याच्या सुटकेसाठी १० लाखांची खंडणी मागणाऱ्या दोघांना नांदेड येथील विमानतळ पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक संजय ननवरे आणि सहायक पोलीस निरीक्षक बाळू गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

हे वाचलं का?

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यापारी रामाश्रय सहाने हे १४ मार्चला रात्री साडेदहा वाजल्याच्या सुमारास घरी जात होते. यावेळी दोन्ही आरोपींनी सहाने यांची गाडी अडवली. दोन्ही आरोपींनी यावेळी सहानेंकडे १० लाखांची खंडणी मागितली. यावेळी सहाने यांनी माझ्याकडे पैसे नाहीत मला मारुन टाका असं सांगताच आरोपीने माझा भाऊ जेलमध्ये त्याला बाहेर काढण्यासाठी १० लाख दे नाहीतर तुला खरंच मारुन टाकेन असं म्हणत तलवारीने वार करत सहानी यांच्या गाडीच्या काचा फोडल्या.

यावेळी सहाने यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी यानंतर तपासाची चक्र वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

    follow whatsapp