गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाची चर्चा सध्या सर्वत्र होताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारमधल्या तिन्ही पक्षांनी राज यांच्या भाषणावर सडकून टीका करायला सुरुवात केली असताना भाजप मात्र राज यांच्या पाठींब्यासाठी धावून आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन राज ठाकरेंचं कौतुक करत त्यांच्यावर टीका करणाऱ्या नेत्यांना सुनावलं आहे.
ADVERTISEMENT
राज ठाकरेंनी आपल्या भाषणात महाविकास आघाडी सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. महाराष्ट्रातलं वास्तववादी चित्र त्यांनी सांगितलं जे काही जणांना झोंबलं. ज्यांनी आयुष्यभर स्वार्थीपणाने आणि सोयीने सत्ता मिळवली त्यांनी राज ठाकरेंच्या भाषणावर प्रतिक्रीया द्यावी हे ही आश्चर्य आहे, असं राणे म्हणाले.
दुसरीकडे भाजपचे राज्यसभेचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनीही राज ठाकरेंच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. राज ठाकरेंची भूमिका हिंदुत्वासाठी अनुकूल राहिली आहे. त्यांनी जर हिंदुत्वावर भर दिला असेल ते हिंदुत्वाच्या भल्यासाठीच असल्याचं सहस्रबुद्धे म्हणाले. राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याबद्दल घेतलेल्या भूमिकेवर बोलताना सहस्रबुद्धे म्हणाले, “खऱ्या अर्थाने सलोखा आणि सामंजस्य नांदायचे असेल तर कोणालाही विशेष अधिकार देता कमा नयेत. या अर्थाने राज ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत झालं पाहिजे.”
फायरब्रँड नेते ‘पुष्पा’तले फ्लॉवर का झाले? मनसेची साथ सोडलेल्या रुपाली पाटलांची टीका
भविष्यात मनसे आणि भाजप एकत्र येणार का या प्रश्नाला उत्तर देताना सहस्रबुद्धेंनी सावध प्रतिक्रीया दिली. राज ठाकरे राजकीय नेते आहेत, ते एका राजकीय पक्षाचे प्रमुख आहेत. ते त्यांचा मार्ग निवडतील. अटकळबाजीच्या माध्यमातून पतंग उडवण्यात काहीच अर्थ नसल्याचं सहस्रबुद्धे म्हणाले.
मशिदीवरील भोंग्याचं राजकारण : राज ठाकरेंच्या भूमिकेला सुजात आंबेडकरांचा पाठींबा, पण…
ADVERTISEMENT