राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीने अटक केलेली असून, त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. भाजपकडून या मागणीसाठी राज्यभर आंदोलनही केली जात आहे. मात्र, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेचाही शरद पवारांनी दाखला दिला होता. त्यावरुन आता राणेंनी शरद पवारांवर टीका केली आहे.
ADVERTISEMENT
नारायण राणे काय म्हणाले?
व्वा पवारसाहेब, या वाक्यावरून काय बोलावं की आपली कीव करावी, मला कळत नाही. आमचा कधी दाऊद दोस्त नाही. आमचा कधी संबंध आला नाही. तो देशद्रोही आहे. आमचे हजारो लोक बॉम्बस्फोटात मारले आहेत. त्या दाऊदसोबत नवाब मलिकांचा संबंध आहे. त्यामुळे त्यांना अटक झाली आणि आम्ही राजीनाम्याची मागणी करत आहोत,” असा आरोप राणेंनी केला.
अमित शाहांना फोन, उद्धव ठाकरेंचा उल्लेख; ९ तासांच्या चौकशीनंतर राणेंचे गंभीर आरोप
“तुम्ही त्यांचा राजीनामा मागितला पाहिजे. तुम्ही हेच केलं आयुष्यभर. हीच तुमची पुण्याई आहे. या देशाचे नागरिक म्हणून अन्यायाविरुद्ध आवाज उठवणार. आमचा आवाज कुणीही दाबू शकणार नाही”, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले.
शरद पवार राणेंबद्दल काय म्हणाले होते?
भाजपकडून केल्या जाणाऱ्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना शरद पवार म्हणाले होते, ‘नवाब मलिकांचा राजीनामा घ्या असं ते का म्हणतात? कारण त्यांना अटक केली आहे. कबूल आहे. मला काळजी एकच आहे की, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आमचे एक जुने सहकारी आहेत, राणे साहेब… त्यांनाही अटक केल्याचं वाचलं होतं. तुमच्या कोणाच्या वाचनात आलं की नाही माहित नाही. त्यांनाही अटक केली होती. त्यांना अटक केल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळातून कमी करण्याचा निर्णय कुणी घेतला असं काही माझ्या अद्याप पाहण्यात आलेलं नाही,” उत्तर पवारांनी दिलं होतं.
‘राज्यपालांवर भाष्य न केलेलंच बरं.. वर्ष उलटून गेलं तरी राज्यपालांनी आमदार नियुक्त केले नाही’, पवार संतापले
“मला असं वाटतं की, नवाब मलिक यांना अटक केली, त्यानंतर आमचं स्वच्छ मत आहे की, त्यांना राजकीय हेतूने अटक केलेली आहे. गेली 20 वर्ष महाराष्ट्राच्या विधानसभेत नवाब मलिक आहेत. त्या सगळ्या काळात हे चित्र कधी दिसलं नाही. ते आत्ताचं दिसू लागलं आहे.”
“एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला की, त्याचा संबंध दाऊदशी जोडला जातो. एका दृष्टीने काही कारण नसताना हा आरोप केला जात आहे. खरं म्हणजे मला त्याची चिंता नाही. कधीकाळी माझ्यावर देखील असे आरोप झाले होते”, असं पवारांनी म्हटलं होतं.
ADVERTISEMENT