मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत नारायण राणे यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांना भोवलं आहे असं दिसतं आहे. कारण त्यांच्या अटकेसाठी सरकारने तयारी सुरू केली आहे. अशात नारायण राणेंतर्फे अटकपूर्व जामिनासाठी रत्नागिरी न्यायालयात केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आता हायकोर्टात धाव घेणार आहेत.
ADVERTISEMENT
नारायण राणे यांच्यावर तांत्रिकदृष्ट्या अटकेची कारवाई करू शकतात. त्यानंतर गुन्हा नाशिकमध्ये दाखल झाल्याने नारायण राणे यांना नाशिक पोलिसांच्या ताब्यात दिलं जाईल असं कळतं आहे.
जन आशीर्वाद यात्रेदरम्यान महाडमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक मुद्यांवरुन टीका केली. सुरुवातीला नारायण राणेंनी राज्यातील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन यावरुन बरीच मुख्यमंत्र्यांवर बरीच टीका केली.
‘या माणसाकडे कोणातीही उपाययोजना नाही. काही झालं की, लॉकडाउनची भीती दाखवली जाते. महाराष्ट्रात आज व्यापाऱ्यांची हालत गंभीर आहे. आर्थिक फटका बसल्यामुळे ते 10 वर्ष माना वर काढू शकत नाही. आरोग्य विभागाची अवस्था भयावह आहे. स्टाफ नाही, डॉक्टर नाही, लस नाही अशी गंभीर परिस्थिती राज्यात आहे.’ असं म्हणत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता.
त्यानंतर पुढे ते असं म्हणाले की, ‘या मुख्यमंत्र्यांना देशाचा हिरक महोत्सव आहे की अमृत महोत्सव हेच माहिती नाही. 15 ऑगस्टला राज्यातील जनतेला उद्देशून भाषण करत असताना उद्धव ठाकरे मागे उभे असलेल्या मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना विचारतात हिरक महोत्सव आहे ना? मी त्या जागी असतो तर कानाखाली चढवली असती. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी हे किती चीड आणणारी गोष्ट आहे.’ असं वक्तव्य राणेंनी महाडमध्ये केले होतं.
ADVERTISEMENT