नाना पटोलेंच्या समोरच उदय सामंतांना जीवे मारण्याची धमकी, रिफायनरी विरोधात नरेंद्र जोशी आक्रमक

मुंबई तक

• 07:04 AM • 12 Sep 2022

रत्नागिरी: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काल कोकण दौऱ्यावरती होते. तिथं त्यांनी रिफायनरी विरोधक आणि समर्थकांची भेट घेतली. यावेळी रिफायनरी विरोधक नरेंद्र जोशी यांनी भर सभेत मंत्री उदय सामंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे या सभेमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलीसही उपस्थित होते. नाना पटोले रिफायनरीबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी राजापूरमध्ये आले होते, […]

Mumbaitak
follow google news

रत्नागिरी: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले काल कोकण दौऱ्यावरती होते. तिथं त्यांनी रिफायनरी विरोधक आणि समर्थकांची भेट घेतली. यावेळी रिफायनरी विरोधक नरेंद्र जोशी यांनी भर सभेत मंत्री उदय सामंत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे या सभेमध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि पोलीसही उपस्थित होते. नाना पटोले रिफायनरीबाबत वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी राजापूरमध्ये आले होते, यावेळी रिफायनरी विरोधकांच्या सभेमध्ये सामंतांना धमकी देण्यात आली. आता याप्रकरणी पोलिसांकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

कोकण रिफायनरीला काँग्रेसचाही विरोध?

कोकण रिफायनरीमुळे निसर्ग, प्राणी, जलचर यांना हानी होत असेल, तर काँग्रेस त्याचे समर्थन करणार नाही, अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल घेतली आहे. त्यामुळे आता कोकणातील रिफायनरीला काँग्रेसचा देखील विरोध आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाना पटोलेंनी काल रिफायनरी विरोधक आणि समर्थक अशी दोघांची भेट घेतली होती. यावेळी रिफायनरी विरोधी महिलांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे.

नितीन गडकरींच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन नानांनी साधला निशाणा

नितीन गडकरी ऍग्रो व्हिजन फाउंडेशन तर्फे आयोजीत एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी भाजपला घरचा आहेर दिला होता. ”मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे सरकारच्या फार भरोशावर राहू नका. मी सरकार आहे म्हणून सांगतो आपल्याकडे दोन गोष्टी होतात एक तर आपला विश्वास सरकारवर आहे किंवा मग परमेश्वरावर आहे.” असं वक्तव्य नितीन गडकरींनी केलं होतं. नितीन गडकरी नेहमीच आपल्या वक्तव्यांसाठी ओळखले जातात. अनेकदा ते आपल्या सरकारच्या विरोधात मोकळेपणाने बोलत असतात.

    follow whatsapp