इगतपूरीमध्ये आज पहाटे मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज विला या बंगल्यावर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांनी धाड मारली. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत २२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांना आपल्या खबऱ्या मार्फत या बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या पार्टीत दहा पुरुष आणि १२ महिलांचा समावेश होता. १२ महिलांपैकी ४ महिला या फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या आहेत. बिग बॉस या प्रसिद्ध टीव्ही शो मध्ये काम केलेल्या एका अभिनेत्रीचाही यात समावेश असल्याचं कळतंय.
शनिवारी मध्यरात्री दोन वाजल्याच्या सुमारास पोलीस अधिक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने बंगल्यावर छापा मारत २२ जणांना ताब्यात घेतलं असून पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
इगतपुरीत येथील मानस रिसॉर्ट हद्दीतील स्काय ताज व्हिला येथील बंगल्यावर रेव्ह पार्टी सुरु असल्याची गुप्त बातमी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी मिळाली होती. ही बातमी मिळताच पोलिसांनी धाड मारून ही मोठी कारवाई केली.
या व्हिलामध्ये रेव्ह पार्टी चालू होती. या पार्टीमध्ये फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या 4 महिलांचा समावेश तसेच एक बिग बॉसमध्ये भाग घेतलेल्या एका महिला अभिनेत्रीचा देखील समावेश होता. दरम्यान, ही अभिनेत्री कोण होती हे अद्याप समोर आलेलं नाही.
शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी टीमसोबत धाड टाकली होती. यावेळी पोलिसांनी या बंगल्यातून बऱ्याच गोष्टी ताब्यात घेतल्या आहेत.
ADVERTISEMENT