प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
ADVERTISEMENT
हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रात पावसासह गारपीटीचा अंदाज दिलेला आहे, आई असताना तपमानात कमालीची घट झाली. नाशिकचा पारा १४.९ अंशांवरून थेट ६.६ अंशावर घसरला तर निफाडचा पारा १० अंशावरून थेट ५.५ अंशांवर घसरला, वातावरणात १० किमी वेगाने हवा असल्यामुळे बोचऱ्या थंडीचा अनुभव सध्या येत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून आयएमडी ने महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागात पावसाचा आणि गारपीटीचा अंदाज वर्तवला होता.
यानंतर पाकिस्तानमधून आलेल्या धुळीच्या वादळामुळेदेखील तापमान कमी झाल्याचे दिसून येत आहे. ह्या वादळामुळे येत्या दोन दिवसांत आणखी थंडीत घट होईल मात्र त्यानंतर कडक थंडी पडेल असा अंदाज हवामान तज्ञ देत आहेत. यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद नाशिक जिल्ह्यात झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या अचानक थंडीने नाशिक गारठले आहेत. घसरत असलेल्या पार्यामुळे शेतकर्यांच्या चिंतेत भर पडली असून कांदा व द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत दिसून येत आहेत.
उत्तर महाराष्ट्रात थंडीचा मुक्काम वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची लागवड झालेली आहे. थंडीमुळे कांद्याच्या वाढणीवर परिणाम होत आहेत, कांद्याला कधी पाणी द्यावे किंवा ताण द्यावा ह्याबाबत शेतकरी संभ्रमात आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की रात्रीपेक्षा सूर्यप्रकाशात पाणी देणे चांगले आहे,
आणखी थंडी वाढली तर द्राक्ष मन्यांना तडे जाणे, पाने कोरडी होणे असे प्रकार वाढणार आहे. यावर उपाय म्हणून शेतकरी भल्या पहाटे बागेतगवत जाळून उष्णता तयार करू लागली आहेत. नाशिकमधून जानेवारी ते एप्रिल मध्ये मोठ्या प्रमाणावर द्राक्ष निर्यात होते, मात्र निर्यातक्षम द्राक्षांना थंडीने नुकसान होत आहे, तर शेतकऱ्यांचा औषध फवारणीचा खर्च वाढत आहे. तर शेतकरी पहाटेपासून द्राक्षबागेत शेकोटी व धूर करून द्राक्ष बाग वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
ADVERTISEMENT