मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर पुन्हा एकदा आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी थोड्या वेळापूर्वीच ट्विट केलं असून त्यामध्ये त्यांनी समीर वानखेडे यांच्या आईच्या मृत्यू दाखल्याचे दोन फोटो शेअर केले आहेत. ज्यानुसार मलिकांनी दावा केला आहे की, एकाच व्यक्तीच्या दोन वेगवेगळ्या धर्माची नोंद कशी काय करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
‘आणखी एक फर्जिवाडा, अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य आहे दाऊद ज्ञानदेव’ असं ट्वीट करत नवाब मलिक यांनी ट्विटरवर दोन कागदपत्रं शेअर केले आहेत.
नवाब मलिक यांचा नेमका आरोप काय?
आर्यन खान ड्रग्स केस प्रकरणानंतर नवाब मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्याविरोधात एकामागोमाग एक आरोप करत आहेत. नवाब मलिक यांचा वानखेडेंवर असा आरोप आहे की, समीर वानखेडे हे मूळ मुस्लिम होते. मात्र, सरकारी नोकरी मिळविण्यासाठी त्यांनी आपला धर्म बदलला होता. त्यामुळे वानखेडे यांनी घोटाळा करुन सरकारी नोकरी मिळवली आहे. असा मलिक यांचा आरोप आहे.
याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी गुरुवारी (25 नोव्हेंबर) पुन्हा एकदा ट्विट करत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे.
याच पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी गुरुवारी (25 नोव्हेंबर) पुन्हा एकदा ट्विट करत समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला आहे. समीर वानखेडे यांच्या आईच्या (झाएदा ज्ञानदेव वानखेडे) मृत्यू दाखल्यात हिंदू अशी नोंद आहे. तर अंत्य संस्कारासाठी मात्र त्यांची मुस्लिम अशी नोंद आहे. हेच दोन्ही कागदपत्रं नवाब मलिक यांनी ट्विटरवर शेअर केले आहे.
नवाब मलिकांनी याआधीही वानखेडेंच्या जातप्रमाणपत्राबद्दल काय-काय आरोप केले आहेत?
‘समीर दाऊद वानखेडे यांचा जन्मदाखला आम्ही ट्विटरवर टाकला होता. याविरोधात समीर वानखेडे यांचे वडील न्यायालयात गेले. माझ्या बोलण्यावर बंधन आणून ट्वीट डिलीट करण्याची मागणी केली गेली. आम्ही न्यायालयात कागदपत्रं दाखल केली आहे.’
‘नाव बदलल्याचं एक प्रतिज्ञापत्र 1993 मध्ये महापालिकेसमोर सादर करण्यात करण्यात आलं. 1993चं प्रतिज्ञापत्र दोन व्यक्तींनी दाखल केलं होतं. दाऊद वानखेडे नसून ज्ञानदेव वानखेडे असल्याचं त्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं गेलं. मग जन्मदाखल्यात चिन्हांकित करून बाजूला ज्ञानदेव लिहिलं गेलं.’
Nawab Malik: ‘ये क्या किया तुने समीर वानखेडे?’, नवाब मलिकांनी मध्यरात्रीच शेअर केला नवा फोटो
‘नवीन जन्मदाखला तयार झाला. सेंट पॉल शाळेतील दाखल्यावरही मुस्लीम असल्याचं आणि समीर दाऊद वानखेडे असल्याचं आम्ही समोर आणलं आहे. सेंट जोसेफ शाळेच्या दाखल्यावरही हेच नाव होतं. त्यानंतर सेंट जोसेफच्या टीसीवर नाव बदलण्यात आलं आणि ही फसवेगिरी करण्यात आली.’
‘बोगसगिरीच्या माध्यमातूनच महापालिका आणि शाळेतील नोंदी बदलण्यात आल्या. 1995मध्ये मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला. वडिलांच्या जातीचं प्रमाणपत्र आणि छेडछाड करण्यात आलेला जन्मदाखला देण्यात आला. शाळेची जुनी टीसी न दाखवता सेंट जोसेफची दाखवण्यात आली आणि अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र मिळवलं”, असं मलिकांनी म्हटलं होतं.
‘अनुसूचित जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे कॉलेजमध्ये लाभ घेण्यात आला. समीर वानखेडेंबरोबर त्यांच्या बहिणीनेही याचा लाभ घेतला. त्यानंतर स्पर्धा परीक्षतेही याच प्रवर्गातून लाभ घेण्यात आला. त्याच आधारावर नोकरी मिळवली आहे. काही जणांनी तक्रारी दिल्या आहेत. चौकशी होईल. जातप्रमाणपत्र रद्द होईल आणि यांची (समीर वानखेडे) नोकरी जाईल’, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.
ADVERTISEMENT