पोपटाचा व्यवसाय माझा नाही, तो फडणवीसांचा व्यवसाय- नवाब मलिक

मुंबई तक

• 05:49 PM • 29 Oct 2021

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर पोपटाचा व्यवसाय माझा नाही तो देवेंद्र फडणवीस यांचा व्यवसाय. देवेंद्र फडणवीस यांच्या पोपटाने चिठ्ठ्या काढल्यानंतर ते भविष्यवाणी करत असतात. देवेंद्र फडणवीस पोपट होऊ शकतात, नवाब मलिक नाही असं म्हणत आज नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. 100 पेक्षा जास्त लोकांना 26 खोट्या केसेसमध्ये एनसीबीनी अडकवले आहे, हे अधिकारी बनाव […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे, प्रतिनिधी, नागपूर

हे वाचलं का?

पोपटाचा व्यवसाय माझा नाही तो देवेंद्र फडणवीस यांचा व्यवसाय. देवेंद्र फडणवीस यांच्या पोपटाने चिठ्ठ्या काढल्यानंतर ते भविष्यवाणी करत असतात. देवेंद्र फडणवीस पोपट होऊ शकतात, नवाब मलिक नाही असं म्हणत आज नवाब मलिकांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.

100 पेक्षा जास्त लोकांना 26 खोट्या केसेसमध्ये एनसीबीनी अडकवले आहे, हे अधिकारी बनाव करून लोकांना अडकवत असेल आणि हजारो कोटींची खंडणी वसूल करत असेल तर माझं काम आहे त्यांना थांबवले पाहिजे, ते कर्तव्य म्हणून मी शेवटपर्यंत करणार आहे असंही मलिक म्हणाले.

‘राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय’ खोचक शब्दांत देवेंद्र फडणवीस यांचा नवाब मलिकांना टोला

अनुराग कश्यप यांनी मला त्रास झाला असे सांगितले, एनसीबीचे अधिकारी लोकांना धमकी देत होते, ते आज अटकेच्या भीतत आहे, कश्यप सारखे शेकडो लोक अडकले आहेत. व्हिजिलन्स हेड ज्ञानेश्वर सिंग यांना विनंती आहे निपक्षपने कारवाई करावी, समीर वानखडेची चौकशी करावी वानखेडे नामक अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाई दोन चार पाच ग्राम ड्रग्ज जप्त केले आहेत. एक वर्षपासून केस दाखल करून झाली पण त्यात कारवाई झाली नाही. चित्रपट जगाततील 30 लोकांना बोलवण्यात आले, एकालाही अटक नाही, म्हणजे खंडणीसाठी त्याचा वापर होता याची चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली.

व्हिजिलन्स हेड ज्ञानेश्वर यांना लेखी पत्र देऊन चौकशी समीर वानखेडे प्रकरणात चौकशी करण्यासाठी तक्रार करणार आहे. कुठले वैयक्तिक आरोप करण्यात आलेले नाही त्यांनी शेड्युल कास्ट दाखवून त्याचा फायदा घेतलेला आहे, त्यांच्या वडिलांनी धर्मांतर करून लग्न लावलं आहे शिक्षण मुस्लिम म्हणून झालेलं आहे. त्याच्या जन्माचा दाखला तरीही नाव समीर वानखेडे असे नाव आहे. लग्नाच्या दाखल्यात आणि जन्माचा दाखला यातही दाऊद समीर वानखेडे यांच्या नावाचा उल्लेख आहे असाही आरोप नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा केला.

त्याचे वडील मात्र आता शब्द पलटवत आहे, की मला त्या वेळेस गर्दीत माहित पडले नाही, त्यामुळे मी केलेले आरोप वैयक्तिक नाही हा शेड्युल कास्ट लोकांवर अन्याय आहे, त्यांचा दाखला बोगस असून त्याची चौकशी केली पाहिजे. महाराष्ट्र शासनाचा नियम आहे, ज्यांत मुस्लिम व्यक्तीने धर्मातर केले असेल तर त्याला शेड्युलकास्टचा लाभ घेता येत नाही असंही मलिक म्हणाले.

फडणवीस काय म्हणाले होते?

‘नवाब मलिक यांना काही काम उरलेलं नाही. त्यामुळे ते रोज काही ना काही वक्तव्यं करत असतात. त्यांच्या या वक्तव्यांना महत्त्व देणं फारसं आवश्यक वाटत नाही.’ समीर वानखेडे हे भाजपचा पोपट आहे अशी टीका मलिक यांनी केली असं विचारलं असता फडणवीस म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा पोपट रोज बोलतो आहे ना’ असं म्हणत त्यांनी नवाब मलिक यांच्यावर खोचक शब्दात टीका केली त्याला आता नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे.

    follow whatsapp