मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच मंत्री नवाब मलिक (Nawab malik) यांना ईडी अटक केल्यापासून भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी सुरु केली आहे. यासाठी मुंबईत भाजपकडून मोर्चा देखील काढण्यात आला होता. पण तरीही नवाब मलिकांच्या मंत्रीपदाचा राजीनामा घ्यायचा नाही यावर राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे. पण असं असलं तरी आज (17 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची एक अत्यंत महत्त्वाची बैठक राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ मुंबईतील निवासस्थानी बैठक पार पडली. ज्यामध्ये नवाब मलिकांच्या खात्यांबाबत अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचं समजतं आहे.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादीच्या बैठकीत नवाब मलिक यांच्याकडे असलेलं कौशल्य विकास हे खातं राष्ट्रवादीच्याच राजेश टोपे यांच्याकडे देण्यात येणार आहे. तर अल्पसंख्यांक मंत्रालयाचा कारभार हा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात येणार असल्याचं समजतं आहे.
याशिवाय त्यांच्याकडे ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आहे त्याबाबतही या बैठकीत चर्चा झाली आहे. नवाब मलिक हे सध्या गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री आहेत. त्यांचा कार्यभार लवकरच राष्ट्रवादीच्या दुसऱ्या मंत्र्यांकडे दिला जाण्याची शक्यता आहे.
तसेच नवाब मलिक यांचे पक्षातील काही पदं (राष्ट्रवादी मुंबई अध्यक्ष) देखील इतरांना देण्यात येणार असल्याचं समजतं आहे. मात्र असं असलं तरीही नवाब मलिक यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाणार नाही.
मलिक हे ईडीच्या कोठडीत असल्याने त्यांच्याकडे जी खाती आहेत त्यांचा कारभार रखडू नये म्हणून ही तात्पुरत्या स्वरुपात तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळेच आता नवाब मलिक हे सध्या बिनखात्याचे मंत्री असणार आहेत.
ADVERTISEMENT