आर्यन खानला जामीन मंजूर झाल्यानंतर नवाब मलिक यांचं सूचक ट्विट, म्हणाले..

मुंबई तक

• 12:14 PM • 28 Oct 2021

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री फक्त एका ओळीचं ट्विट केलं आहे. या ट्विटची चांगलीच चर्चा होते आहे. तसंच हे ट्विट अनेकांनी रिट्विटही केलं आहे. आर्यन खानला अखेर पंचवीस दिवसांनी आज बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला. उद्या किंवा परवा त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या नंतर नवाब मलिक […]

Mumbaitak
follow google news

आर्यन खानला जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री फक्त एका ओळीचं ट्विट केलं आहे. या ट्विटची चांगलीच चर्चा होते आहे. तसंच हे ट्विट अनेकांनी रिट्विटही केलं आहे. आर्यन खानला अखेर पंचवीस दिवसांनी आज बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला. उद्या किंवा परवा त्याची तुरुंगातून सुटका होणार आहे. दरम्यान या सगळ्या घडामोडींच्या नंतर नवाब मलिक यांनी एक ट्विट केलं आहे.

हे वाचलं का?

काय आहे नवाब मलिक यांचं ट्विट-

पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! असं एका ओळीचं ट्विट नवाब मलिक यांनी केलं आहे. हा डायलॉग शाहरुख खानच्या ओम शांती ओम या चित्रपटातील आहे. नवाब मलिक यांनी केलेल्या या ट्विटची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच होते आहे.

अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात नवाब मलिक यांचं हे ट्विट 1500 पेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केलं आहे. तर पाच हजारांहून अधिक लोकांनी हे ट्विट लाईक केलं आहे.

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला बॉम्बे हायकोर्टाने जामीन मंजूर केला आहे. 2 ऑक्टोबरला एनसीबीने छापा मारून त्याला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आत्तापर्यंत तीनवेळा त्याला जामीन नाकारण्यात आला होता. आज अखेर त्याला जामीन मिळाला आहे. उद्या किंवा परवा आर्यन खान तुरूंगाबाहेर येणार आहे. आज हायकोर्टाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून घेतला. यानंतर आज हायकोर्टाने आर्यन खान, मुनमुन धमेचा, अरबाझ मर्चंट या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.

आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट या तिघांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे. डिटेल ऑर्डर उद्या दिली जाणार आहे. दिवाळीच्या आधी या तिघांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंट यांना उद्या किंवा परवा तुरुंगाबाहेर येता येणार आहे. आर्यन खानला 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आली होती.

आर्यन खानला सत्र न्यायालयाने दोनदा जामीन नाकारला होता. एवढंच नाही तर हायकोर्टानेही मागचे दोन दिवस सुनावणी राखून ठेवली होती. जर आर्यनला आज किंवा उद्या जामीन मंजूर झाला नसता तर त्याची दिवाळी तुरुंगातच होणार होती. मात्र मुकुल रोहतगी यांनी आज ही माहिती दिली आहे की उद्या किंवा परवा म्हणजेच शुक्रवारी किंवा शनिवारी आर्यन खानला तुरुंगाबाहेर येता येणार आहे. तीन दिवस हे प्रकरण सुनावणीसाठी बॉम्बे हायकोर्टात होतं.

    follow whatsapp