ADVERTISEMENT
बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीविरुद्ध एक्स पत्नी आलिया सिद्दीकीने गंभीर आरोप केले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये वादविवाद सुरू आहेत. त्यांचं हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेलं.
आता नुकताच एक्स पत्नी आलिया सिद्दीकीने एक व्हिडीओ शेअर करत मोठा आरोप केला आहे.
आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
व्हिडीओमध्ये आलिया सिद्दीकी रडत असून नवाजुद्दीन सिद्दीकीला तिची मुलं तिच्यापासून हिसकावून घ्यायची आहेत, असं सांगत आहे.
व्हिडीओ शेअर करताना आलियाने लिहिलं, ‘एक महान अभिनेता जो अनेकदा महान माणूस बनण्याचा प्रयत्न करतो.
नवाजुद्दीनने न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याला मुलांचा ताबा हवा आहे.
‘नवाजला आजपर्यंत मुलांचे डायपर कसे बदलायचे, त्यांची काळजी कशी घेणार हेच कळत नाही.’ असं पत्नी म्हणाली.
ADVERTISEMENT