अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील सहकाराची कामधेनू असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणुकीचा निकाल जाहीर आज जाहीर झाला. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या निवडणुकीच्या या निकालात माजी मंत्री आणि भाजप नेते मधुकरराव पिचड आणि माजी आमदार वैभव पिचड यांचा पराभव झाला आहे. आधी आमदारकी मग ग्रामपंचायत आणि आता कारखान्यातही पिचड यांच्या या पराभवाची मोठी चर्चा होत आहे.
ADVERTISEMENT
इंदोरी सर्वसाधारण उत्पादक गटातून शेतकरी विकास मंडळचे उमेदवार वैभव पिचड यांच्यासह कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रकाश नवले, माजी संचालक भाऊसाहेब खरात व अपक्ष उमेदवार प्रकाश हासे यांचा पराभव झाला आहे. तर शेतकरी समृद्धी मंडळाचे उमेदवार आणि विद्यमान संचालक अशोक देशमुख, पाटीलबा सावंत आणि खंडेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप हासे यांचा विजय झाला आहे.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत 5 गटातील 21 जागांसाठी 45 उमेदवार रिंगणात होते. यासाठी रविवारी चुरशीचे मतदान पार पडले होते. यावेळी 8 हजार 392 मतदारांपैकी 7 हजार 116 इतक्या म्हणजे जवळपास 87.39 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. याच निवडणुकीचा निकाल आज (सोमवारी) जाहीर होत आहे. यातील 5 पैकी 3 गटाचा निकाल आतापर्यंत जाहीर झाला असून अद्याप 2 गटांचा निकाल बाकी आहे.
या निवडणुकीत मधुकरराव पिचड आणि वैभव पिचड यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास मंडळ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. किरण लहामटे, कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, माकप नेते डॉ. अजित नवले यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळात सरळ लढत होती.
इंदोरी सर्वसाधारण उत्पादक गट निकाल :
शेतकरी समृद्धी मंडळाचे विजयी उमेदवार आणि कंसात त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे –
-
अशोक देशमुख – 4110 मतं
-
पाटीलबा सावंत – 3991 मतं
-
प्रदिप हासे – 3968 मतं
शेतकरी विकास मंडळाचे पराभूत उमेदवार आणि कंसात त्यांना पडलेली मते पुढील प्रमाणे –
-
भाऊसाहेब खरात – 2830 मतं
-
वैभव देशमुख-पिचड – 2677 मतं
-
प्रकाश नवले – 2541 मतं
अपक्ष उमेदवार – (पराभूत)
-
प्रकाश रामभाऊ हासे-195 मतं
ADVERTISEMENT