सचिन वाझेंना अटक, शरद पवार म्हणतात…

मुंबई तक

• 09:05 AM • 14 Mar 2021

मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांप्रकरणी NIA ने मुंबई पोलिसांचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. शनिवारी रात्री १३ तासांच्या चौकशीनंतर NIA च्या पथकाने ही कारवाई केल्याचं समजतंय. वाझेंना अटक व्हावी यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. वाझेंना अटक झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांनी सावध प्रतिक्रिया […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या संशयित स्कॉर्पिओ गाडीतील स्फोटकांप्रकरणी NIA ने मुंबई पोलिसांचे अधिकारी सचिन वाझे यांना अटक केली आहे. शनिवारी रात्री १३ तासांच्या चौकशीनंतर NIA च्या पथकाने ही कारवाई केल्याचं समजतंय. वाझेंना अटक व्हावी यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारला धारेवर धरलं होतं. वाझेंना अटक झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील प्रमुख नेत्यांनी सावध प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.

हे वाचलं का?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आज पत्रकार परिषदेत सचिन वाझे यांच्या अटकेसंदर्भात प्रश्न विचारला असता, वाझे यांची अटक हा अगदीच छोटा विषय आहे. मी त्यावर काही बोलू इच्छित नाही. हे काही राज्याचं धोरण नाही अशा शब्दांत पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

‘त्या’ इनोव्हा कारबाबत नवी माहिती समोर, वाझेंच्या अडचणी वाढणार?

दुसरीकडे विधानसभेचे माजी अध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधत…महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम भाजप करत असल्याचं म्हटलंय. तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ATS आणि NIA या प्रकरणाचा तपास करत असून योग्य ती कारवाई राज्य आणि केंद्र सरकार करेल असं आश्वासन दिलं आहे.

वाझेंची अटक आणि POLICE लिहिलेल्या Innova कारचा नेमका संबंध काय?

    follow whatsapp