Jitendra Awhad यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल होणार?

मुंबई तक

04 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:26 AM)

(NCP MLA Jitendra Awhad news) मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. आपल्यावर विनयभंगानंतर आता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचं नियोजन सुरु असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. एका महिलेचा व्हिडीओ ट्विट करुन आव्हाड यांनी हा दावा केला आहे. तसंच याबाबतचं नियोजन मंत्रालयात सुरु असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे. काय म्हणाले जितेंद्र […]

Mumbaitak
follow google news

(NCP MLA Jitendra Awhad news)

हे वाचलं का?

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. आपल्यावर विनयभंगानंतर आता बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याचं नियोजन सुरु असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. एका महिलेचा व्हिडीओ ट्विट करुन आव्हाड यांनी हा दावा केला आहे. तसंच याबाबतचं नियोजन मंत्रालयात सुरु असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला आहे.

काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

354 चा कट फसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 376 ची तयारी सुरु केली आहे. 354 मध्ये नाट्यपूर्ण भूमिका घेणाऱ्या आता या कटातही आघाडीवर आहेत. आज दुपारी त्या मंत्रालयासमोर गाडीत बसलेला व्हिडीओ. त्या कोणाला भेटल्या, कशा भेटल्या चर्चा मंत्रालयात सुरु आहे.

जितेंद्र आव्हाडांवर विनयभंगाचा गुन्हा :

काही दिवसांपूर्वी जितेंद्र आव्हाड यांच्यावर एका पुलाच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान विनयभंग केल्याचा आरोप एका महिलेने केला होता. त्यावरुन बरंच नाट्य रंगलं होतं. त्यांची अटक आणि जामीन याबाबत मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. आपल्यावर हा गुन्हा बेकायदेशीर आणि राजकीय षडयंत्रातून दाखल केला असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

या कार्यक्रमास जितेंद्र आव्हाड यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. यावेळी शिंदे गाडीत बसून जात असताना महिला त्यांना भेटण्यासाठी जात होती. त्यावेळी आव्हाड हे समोरून येत होते. तेव्हा त्यांनी एका महिलेला वाटेतून बाजूला केलं होते. पण त्यांनी विनयभंग करण्याच्या उद्देशाने दोन्ही खांद्यास दाबून काय उभी आहे, बाजूला हो असे म्हणत ढकललं असल्याची तक्रार एका महिलेनं केली होती.

त्यानंतर आता आपल्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करणार असल्याचा दावा आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान, ३५४ हे कलम भारतीय दंड संहितेनुसार विनयभंग आणि लैंगिक छळाशी संबंधित आहे. तर कलम 376 भारतीय दंड संहितेनुसार बलात्काराच्या गुन्ह्याशी संबंधीत आहे. हाच गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरु असल्याचं त्यांनी ट्विट करुन म्हटलं आहे.

    follow whatsapp