चक्क अजित पवारांनी केली राज ठाकरेंची नक्कल, मिश्किल शब्दात लगावले टोले

मुंबई तक

02 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:49 AM)

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या जाहीर भाषणात अनेक नेत्यांच्या नकला करुन त्यांच्यावर टीका करतात हे आपण पाहिलचं आहे. त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज ठाकरे यांच्या टार्गेटवर नेहमीच असतात. अनेकदा अजित पवारांची नक्कल करुन राज ठाकरे त्यांच्यावरी टीका करतात. पण आज चक्क अजित पवारांनीच राज ठाकरे यांची नक्कल करत त्यांच्यावर मिश्किल भाषेत टिप्पणी […]

Mumbaitak
follow google news

नाशिक: मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आपल्या जाहीर भाषणात अनेक नेत्यांच्या नकला करुन त्यांच्यावर टीका करतात हे आपण पाहिलचं आहे. त्यातही उपमुख्यमंत्री अजित पवार हे राज ठाकरे यांच्या टार्गेटवर नेहमीच असतात. अनेकदा अजित पवारांची नक्कल करुन राज ठाकरे त्यांच्यावरी टीका करतात. पण आज चक्क अजित पवारांनीच राज ठाकरे यांची नक्कल करत त्यांच्यावर मिश्किल भाषेत टिप्पणी केली आहे.

हे वाचलं का?

नाशिकमधील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरे हे सरड्यासारखे रंग बदलतात असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंवर टीकेचे बाण सोडले. पण याचवेळी त्यांनी राज ठाकरे ज्या पद्धतीने त्यांच्या हातातील नॅपकिन कसा वापरतात याचीच नक्कल करुन दाखवली.

पाहा अजित पवारांनी राज ठाकरे यांची नेमकी कशी नक्कल केली:

‘राज ठाकरेंनी पूर्वीचीच कॅसेट पुन्हा लावली आहे. म्हणे पवार साहेब जातीयवादी आहेत. तुम्हा नाशिककरांना माहिती आहे की, पवार साहेब जातीयवादी आहे की नाही. राजू शेट्टी यांनी सांगितलं की, पवार साहेब जातीयवादी नाहीत. रामदास आठवलेंनी पण सांगितलं की, साहेब जातीयवादी नाही. साहेबांची 50 वर्षांची राजकीय कारकीर्द तुमच्यासमोर आहे ना. त्यामध्ये एखादा धादांत खोटं बोलत असेल तर त्याच्या बोलण्याला फार महत्त्व द्यायचं काय कारण?’

‘लोकसभेच्या वेळेस आपली सुपारी घेतली होती. आता त्यांची घेतली आहे. म्हणजे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या सपोर्टने ते बोलत होते. नाहीतर लगेच ब्रेकिंग न्यूज.. त्यामुळे तसं काही बोललो नाही.’

‘त्या काळात भाषणं काय केली तर केंद्र सरकारविरोधात भाषणं केली. आता मात्र, भाषणं कशी चालली आहेत. काल दुसऱ्या कुठल्याही नेतृत्वावर टीका नाही. फक्त शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तेच तेच पवार साहेब शिवाजी महाराजांचं नाव घेत नाही. शाहू-फुले-आंबेडकरांचं नाव घेतात. अरे पवार साहेबांनी कोणाचं नाव घ्याव, कुणाचं नाव घेऊ नये हेच एकेकाळी पवार साहेबांची मुलाखत घेत असताना काय कौतुक करायचे.’

‘अरे बापरे.. बापरे.. बापरे किती झटपट सरड्यासारखे रंग ही लोकं बदलतात हे त्यांनाच माहिती. आम्ही जर एखाद्याचं कौतुक केलं तर नंतर टीका करायची म्हटलं तर 50 वेळा विचार करतो की, कसं बोलायचं. जीभ पण वळत नाही. परंतु यांना काहीही घेणंदेणं नाही.’

‘यातून कधी तरी 15 एक दिवसांनी सभा संध्याकाळी दिवस मावळल्यावर.. उन्हा-बिन्हाचं नाही.. सूर्य मावळल्यावर जरा वातावरण बरं असल्यावर.. ते नॅपकिन कुठंय नॅपकिन.. द्या जरा.’

‘ते नॅपकिन घ्यायचं (राज ठाकरे यांची नक्कल करत) काय पुसतात ते त्यांचं त्यांनाच माहिती. अरे काय आहे ते एकदा शिंकरुन घे ना. सारखं सारखं काय नाकाला नॅपकिन लावायचं.’

‘पुरंदरेंनी इतिहास नाही, तर कादंबरी लिहिली’; आव्हाडांनी पुन्हा राज ठाकरेंना डिवचलं

‘मग काय होतं. मला भुजबळ साहेबांनी गाडीत सांगितलं. अजित काय होतं त्यांनी भाषण केलं की, आपण दोन-तीन दिवस ती कॅसेट चालवतो. मग मीडिया.. चला मग अजित पवारांनी हे प्रत्युत्तर दिलं. मग ते सगळं 15 दिवस झाल्यावर काय बोलणार वैगरे.. हे असलं सगळं चाललं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा या सगळ्यातून लोडशेडिंगचा किंवा लोकांचे महत्त्वाचे प्रश्न सुटणार नाहीत.’ अशी टीका अजित पवार यांनी केली.

    follow whatsapp