मुंबई: राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे सोशियल मीडियावरती फारच सक्रिय असतात. त्या कुठेही गेल्या तरी त्या सोशियल मीडियावरती व्यक्त होत असतात. सध्या त्यांना ते व्यक्त होणं कुठेतरी महागात पडलेलं दिसत आहे. कारण एक दिवसापूर्वी सुप्रिया सुळेंनी आपल्या सोशियल मीडिया अकाऊंटवरती नॉन व्हेज खाल्याचे फोटो टाकले होते. त्यावरुन आता त्यांना ट्रोल केलं जात आहे. त्यांच्या त्या फोटोंवरती अनेक कमेंट येत आहेत. कोणी श्रावण महिन्याचं कारण देतंय तर कोणी विनायक मेटेंच्या निधनाचं कारण देत कमेंट करत आहेत.
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळेंनी काय पोस्ट केली आहे?
सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदास संघाच्या खासदार आहेत. त्यांच्या मतदार संघात इंदापूर नावाचं गाव आहे तिथल्या एका हॉटेलमधले फोटो सुप्रिया सुळेंनी आपल्या फेसबूकवरती शेअर केले. ”हॉटेल वर्धिनीमधील खरोखरच स्वादिष्ट जेवण” अशा आशयाचं कॅप्शन देखील त्यांनी त्या फोटोंना दिलं आहे. या फोटो टाकताच अनेकांनी त्यावरती कमेंट केल्या आहेत.
युजर्सनी सुप्रिया सुळेंच्या पोस्टवरती काय कमेंट केल्या आहेत?
सुप्रिया सुळेंनी पोस्ट टाकताच अनेकांच्या भावना दुखावलेल्या दिसत आहेत. एका युजर्सने कमेंट करताना म्हटले ”सुप्रियाताई हिंदु धर्मातील श्रावण महिना आहे. तुम्ही पाळत नाहीत माहिती आहे पण अस सोशल मीडियावर पोस्ट करुन तुम्ही किती कट्टर नास्तिक आहात हे सिध्द करताय. असो….” अशा आशयाची कमेंट केली आहे.
दुसऱ्या युजर्सने लिहिले ”विनायकराव मेटे तुमचे एके काळचे सहकारी होते. मराठवाडा शोककळेत असताना आज तुम्ही मात्र मटणावर ताव मारताय. मृत्युचे दु:ख पाळण्याचं साधं सौजन्यही तुमच्याकडे नाही!”
काही युजर्सने सुप्रिया सुळेंची पाठराखण देखील केली आहे. ”दोन व्यक्ती असतात एक नॉनवेज खातात आणि दूसरे व्हेज, श्रावणात नाही खात, शनिवारी, गुरुवारी नाही खात हे एक नवीनच, खायचे तर सर्वच खा आणि प्रत्येक दिवशी खा, नाही खायचे तर नका खाऊ, प्रत्येक मानसाचा वैयक्तिक प्रश्न आहे. मग तो राजकारणी असो किंवा सामान्य व्यक्ति, एक मित्र शनिवारी रात्री पार्टींमध्ये मटन खात नवहता, दोन तासाने १२ वाजता रविवार लागला की खातो म्हने, त्याला समजाऊन सांगीतले की पृथ्वीवर ऑस्ट्रेलियामध्ये रविवार सुरु आहे, तेव्हा कुठ हातात पीस घेतला त्याने…” अशा आशयाची कमेंट करुन एका युजर्सने सुप्रिया सुळेंची पाठराखण केली आहे.
दरम्यान सुप्रिया सुळेंकडे संवेदनशील नेत्या म्हणून पाहिलं जात. देशातील प्रत्येक मुद्द्यावर त्या स्पष्टपणे आपलं मत मांडत असतात, मग ते माध्यमांवरती किंवा देशाच्या संसदेत. या प्रकरणावरती सुप्रिया सुळेंची अजून काही प्रतिक्रिया आलेली नाही.
शरद पवारही झाले होते ट्रोल
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही नॉन-व्हेजच्या मुद्द्यावरुन ट्रोल झाले होते. शरद पवार पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या समोरच्या भिडे वाड्यातील महात्मा फुलेंनी सुरु केलेल्या पहिल्या शाळेच्या भेटीला गेले होते. सर्वांना वाटले होते शरद पवार दगडूशेठच्या दर्शनाला जातील परंतु त्यांनी मंदिराच्या बाहेरुन हात जोडले आणि निघाले. त्याचे स्पष्टीकरण देताना राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले ”साहेबांनी नॉन-व्हेज खाल्याने मंदिरात गेले नाहीत.” यानंतर नास्तिक म्हणून शरद पवारही ट्रोल झाले होते.
ADVERTISEMENT