बारामती : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाडव्यादिवशी परंपरेप्रमाणे यंदा देखील माळेगावमधील ‘गोविंद बाग’ या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी शरद पवार आणि कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे गोविंद बाग निवासस्थानाला यात्रेचं स्वरुप आलं होतं.
ADVERTISEMENT
या कार्यक्रमाला विरोधीपक्ष नेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, पार्थ पवार यांनीही उपस्थित राहत कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला, तसंच येणारं वर्ष सुख-समृद्धीचं जावो अशा सदिच्छा दिल्या. यानंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
अजितदादांसारखा नेता मुख्यमंत्री झाला तर…
राष्ट्रवादीचा नेता मुख्यमंत्री होत असेल आणि त्यातही अजित दादांसारखा नेता मुख्यमंत्री झाला तर पक्षाला आणि राज्याला निश्चितच फायदा होईल. पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट एकत्र निवडणूक लढविल्यानंतर त्याठिकाणी तिघांना मान्य होईल असा चेहरा पुढे येतो. मात्र कोणीही मुख्यमंत्री झाले तरीही तिथं बसणारा नेता हा धडाडीचा आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेणारा असावा असा टोलाही त्यांनी मारला.
कर्जत-जामखेडमध्ये कोणाला बोलवायचं त्याला बोलवा, बघू कोण जिंकतयं…
ज्यांना ज्यांना माझ्या मतदारसंघामध्ये यायचं आहे त्यांनी यावं. पण माझा विश्वास इथल्या लोकांवर आहे, कार्यकर्त्यांवर आहे, पदाधिकाऱ्यांवर आहे. त्यामुळे मी जिंकणार की नाही हे मी ठरवणार नाही. पण नक्कीच इथे असणारे लोक ठरवतील. जे काम आजपर्यंत केलेला आहे, त्यावर विश्वास आहे. लोकांवर विश्वास आहे.
मी केलेल्या कामावर बोलतो. हवेत आम्ही कधी बोलत नसतो. काही लोकांना हवेत बोलण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे 2024 ला तुम्हाला कोणाला बोलवायचं असेल त्याला बोलवा. मग बघूया कोण जिंकत आणि कोण नाही. मला लोकांवर आणि कार्यकर्त्यांना विश्वास आहे.
ADVERTISEMENT