दत्त-दत्ताची गाय हे गाणं म्हणत महागाईच्या मुद्द्यावरून आणि जीएसटीवरून सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचं भाषण चर्चेत आहे. सुप्रिया सुळे यांनी दत्त-दत्त दत्ताची गाय या कवितेची माध्यमातून मोदी सरकारवर टीका केली. मोदी सरकारने दत्त आणि गाय सोडून सगळ्यावर जीएसटी लावला आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे.
ADVERTISEMENT
‘ही शक्यता नाकारता येणार नाही’; संजय राऊतांच्या ईडी चौकशीवर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
लोकसभेत काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे ?
आम्ही जेव्हा सत्तेत होतो तेव्हा सुषमा स्वराज आमच्या जागी बसत असत. लोकसभेत त्या महागाईवरून टीका करत असत. त्यांच्या भाषणांमध्ये अनेक सूचना असत आम्ही लक्ष देऊन ती भाषणं ऐकत असू. आता मात्र महागाई खूप वाढली आहे. जीएसटी कसा लावला आहे हे सांगण्यासाठी मी तुम्हाला मराठीतली कविता वाचून दाखवते आहे असं म्हणत त्यांनी कविता वाचली.
Supriya Sule: ‘पंतप्रधान मोदींनी आमचं मन दुखावलं’, पाहा सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या
दत्तावर आणि गायीवरच फक्त जीएसटी लावलेला नाही-सुप्रिया सुळे
दत्त-दत्त, दत्ताची गाय, गायीचं दूध, दुधाची साय, सायीचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप ही कविता ऐकून आम्ही लहानाचे मोठे झालो. मोदी सरकारने यातल्या फक्त गाय आणि दत्त यांच्यावर जीएसटी लावलेला नाही बाकी जवळपास सगळ्याच जीवनावश्यक वस्तूंवर केंद्र सरकारने जीएसटी लावला आहे असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे. सुप्रिया सुळे यांनी केलेलं भाषण चांगलंच चर्चेत आहे.
निशिकांत दुबे यांनी त्यांच्या भाषणात असं म्हटलं आहे की देशातील प्रत्येक गरीबाला आम्ही भोजन देत आहोत. देशाचे पंतप्रधान गरीब, वंचितांना भोजन देतो तेव्हा त्यांचे आशीर्वाद घेतात. ते हिशेब मांडत नाहीत. देशाची अवस्था अशी झाली आहे का ? की देशातील गरीब पंतप्रधानांना म्हणेल की आम्हाला दोन वेळचं भोजन दिलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. हीच तुमची विचारसणी आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आहे.
६० वर्षात काहीही झालेलं नाही असं जे म्हटलं जातं त्यावरूनही सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर टीका केली. ६० वर्षात काही झालं नाही असं म्हणणं आता बंद केलं पाहिजे. कारण तुम्हाला सत्तेत येऊन ८ वर्षे झाली आहेत. जेव्हा लग्न करून सून घरात येते आणि तिच्या लग्नाला ८ वर्षे होतात तेव्हा तिचीही जबाबदारी असते, ती नुसतं हे सांगत नाही की सासूचा वारसा काय आहे? ८ वर्षात तिनेही केलेल्या बऱ्याच गोष्टी असतात असंही सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे.
ADVERTISEMENT