जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करणं चुकीचं आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. जितेंद्र आव्हाड यांच्यावर जो आरोप केला गेला आहे आणि विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल केला आहे तो चुकीचा आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
सुप्रिया सुळे यांनी काय म्हटलं आहे?
तुम्ही जो प्रश्न विचारत आहात त्यावर मला विचारायचं आहे की तुम्ही तो व्हीडिओ पाहिला आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उभे होते तिथे कारला चिटकूनच हे झालं आहे. मला तर हा जोक वाटतो आहे. मला विचाराल तर राज्यातल्या सगळ्या महिलांचा अपमान आहे हा. आज मी अंजली दमानिया यांचे आभार मानते आहे. एका वृत्तवाहिनीवर अंजली दमानिया जे बोलल्या त्याचं मी स्वागत करते. अंजली दमानिया यांनी आमच्या कुटुंबावर दिलदारपणे टीका केली आहे. पण आज जे त्या बोलल्या ते महिला म्हणून योग्यच आहे. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणायचं नसतं. तो माणूस म्हणतो आहे की गर्दीत का आली आहे? माझ्याकडे व्हीडिओ आहे मी सगळ्या चॅनल्सवर तो प्ले करायला तयार आहे असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
आणखी काय म्हणाल्या आहेत सुप्रिया सुळे?
राज्याचे माननीय मुख्यमंत्री आहेत, पोलीस आहेत आणि जितेंद्र आव्हाड त्या व्हीडिओत फक्त एका सेकंदासाठी त्या ताईला बाजूला करताना दिसत आहेत. हा विनयभंग होतो का? त्यांनी फक्त तिला बाजूला केलं आहे. आरोप करणं चुकीचं नाही खोटे आरोप करू नका. जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमातला व्हीडिओ चार-पाच वेळा चाललो आहे. हा प्रकार गैरसमजातून झाला आहे. संबंधित महिलेची बाजू नक्की ऐकून घेतली पाहिजे. पण जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचं टोकाचं पाऊल उचलणं अयोग्य आहे असंही सुप्रिया मुळे यांनी म्हटलं आहे.
हरहर महादेव वरूनही टीका
हर हर महादेवच्या वादातही जितेंद्र आव्हाड यांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आलं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. जामीन झाला. आता विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सगळ्याला काय अर्थ आहे मला कळत नाही. या सरकारमधले आमदार शिवीगाळ करतात, पोलीस ठाण्यात गोळीबार करतात त्याचं काय? मला शिवीगाळ करण्यात आली मी राजीनाम्याची मागणी आजपर्यंत केलेली नाही हे सगळे गुन्हे नाहीत का? या सगळ्यांना १०० गुन्हे माफ आहेत का? असाही प्रश्न सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे
ADVERTISEMENT