राष्ट्रवादी काँग्रेस आज NCB आणि समीर वानखेडेंविरोधात कोणता नवा गौप्यस्फोट करणार?

मुंबई तक

• 03:46 AM • 14 Oct 2021

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी कारवाई करुन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केली. मात्र, NCB ने केलेल्या या संपूर्ण कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने सवाल विचारले जात आहेत. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसने असा आरोप देखील केला आहे की, ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक षडयंत्र असून तो छापा […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणी कारवाई करुन नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक केली. मात्र, NCB ने केलेल्या या संपूर्ण कारवाईबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने सवाल विचारले जात आहेत. एवढंच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसने असा आरोप देखील केला आहे की, ही संपूर्ण कारवाई म्हणजे एक षडयंत्र असून तो छापा देखील बनावट होता. याचबाबत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक हे आज (14 ऑक्टोबर) नवी पोलखोल करणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे वाचलं का?

दरम्यान, आज (14 ऑक्टोबर) पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस NCB वर निशाणा साधणार आहे. यावेळी एनसीबीची आणखी एक पोलखोल करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. याबाबतची माहिती देतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून पत्रकार परिषदेचा विषय हा ‘एनसीबीची आणखी एक पोलखोल’ असा असल्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस नेमका कोणता गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

क्रूझ ड्रग्स प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत NCB आणि अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर बरेच आरोप केले आहेत. त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस आता नेमके कोणते आरोप करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शरद पवारांनीही NCB आणि समीर वानखेडेंबाबत उपस्थित केले काही गंभीर सवाल

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल (12 ऑक्टोबर) पत्रकार परिषद घेऊन NCB आणि समीर वानखेडे यांच्याबाबत काही गंभीर सवाल उपस्थित केले होते.

क्रूझ ड्रग्स प्रकरणात केपी गोसावी या साक्षीदारावरुन NCB ला सातत्याने सवाल विचारले जात आहे. मागील काही दिवसापासून गोसावी हा फरार असल्याचं बोललं जात आहे. याच मुद्द्यावरुन शरद पवार यांनी अधिकारी समीर वानखेडेंबाबत काही प्रश्न विचारले आहेत.

‘नवाब मलिक यांनी एका अधिकाऱ्याबाबत काही गोष्टी सांगितल्या. मी देखील केंद्रात काम केलेलं असल्याने त्या वानखेडे या अधिकाऱ्यांबाबत काही माहिती घेतली. ते आधी विमानतळावरील अधिकारी होते. तिथल्या सुद्धा काही कथा मला ऐकायला मिळाल्या. पण त्यावर आताच काही मी बोलणार नाही.’

‘पण इथे काय झालं की, साधारण कुठे काही गुन्हा घडला तर पोलीस किंवा एजन्सी हे आधी पंचनामा करतात. ही साधारणत: पद्धत आहे. अधिकारी जी कारवाई करत असतात ती योग्य आहे. अशी खात्री वाटावी अशा स्वरुपाचे हे पंच असले पाहिजे.’

‘आता असं दिसतंय की, केपी गोसावी ज्यांची पंच म्हणून किंवा साक्षीदार म्हणून निवड करण्यात आली होती ते सध्या फरार आहेत. आता पंच म्हणून ज्याची निवड केलेली आहे ती व्यक्ती जर नंतर येऊ सुद्धा शकत नाही, समोर जाण्यास तयार नाही. पोलिसांसमोर जाण्यास तयार नाही. नार्टोकिक्स ब्युरोमध्ये भेटत नाही. याचा अर्थ त्यांच्या प्रामाणिकपणाबाबत संशय घेतला जाऊ शकतो.’

‘मात्र, त्यापेक्षाही मला चिंता ही आहे की, पंच म्हणून अशा व्यक्तीची निवड केली याचा अर्थ या अधिकाऱ्याचं असोसिएशन कुठल्या प्रकारच्या लोकांशी आहे हे त्यावरुन स्पष्ट होतं. म्हणून हे पंच कोण आहेत, कुठे आहेत याबाबतचं चित्र अद्यापही स्पष्ट नाही.’ असं पवार म्हणाले होते.

    follow whatsapp