Pathaan : ‘सेक्स आणि शाहरुख खान…’; नेहा धुपिया असं का म्हणाली?

मुंबई तक

29 Jan 2023 (अपडेटेड: 01 Mar 2023, 09:52 AM)

Neha Dhupia On Shahrukh Khan : शाहरुख खान (Shahrukh Khan) जेव्हा चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर परतला आहे (After Four Years Onscreen). शाहरुखचा नवा चित्रपट ‘पठाण’ (Watching Pathaan) पाहण्यासाठी अनेक लोक पोहोचत आहेत. जगभरात या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत 400 कोटींचा गल्ला जमवला आहे. शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक उत्सुक आहेत. दरम्यान, अभिनेत्री नेहा […]

Mumbaitak
follow google news

Neha Dhupia On Shahrukh Khan : शाहरुख खान (Shahrukh Khan) जेव्हा चार वर्षांनी रुपेरी पडद्यावर परतला आहे (After Four Years Onscreen). शाहरुखचा नवा चित्रपट ‘पठाण’ (Watching Pathaan) पाहण्यासाठी अनेक लोक पोहोचत आहेत. जगभरात या चित्रपटाने अवघ्या चार दिवसांत 400 कोटींचा गल्ला जमवला आहे. शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी देश-विदेशातील लोक उत्सुक आहेत. दरम्यान, अभिनेत्री नेहा धुपियाचे एक जुने विधान व्हायरल झाले आहे. (An old statement of actress Neha Dhupia went viral)

हे वाचलं का?

Pathaan Movie : ‘पठाण’ चित्रपटाने बॉलिवूडसाठी बदलल्या या ५ गोष्टी

आजही नेहाचे म्हणणे खरे आहे का?

ही गोष्ट 2004 ची आहे जेव्हा नेहा धुपियाने एका मुलाखतीत ‘एकतर सेक्स विकतो किंवा शाहरुख खान’ असे म्हटले होते. आता पुन्हा एकदा नेहा धुपियाने या वक्तव्यावर ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, ‘२० वर्षांनंतरही माझे म्हणणे खरे आहे. ही अभिनेत्याची कारकीर्द नसून राजाची राजवट आहे, असं ती म्हणाली.

2004 सालाबद्दल बोलायचे झाले तर, त्यावेळी नेहा धुपियाचा ‘जुली’ चित्रपट आला होता. या चित्रपटात अभिनेत्रीने अनेक इंटिमेट सीन्स दिले होते. नेहा धुपियाने ‘जुली’मध्ये सेक्स वर्करची भूमिका साकारली होती. येथून तिला सेक्स सिम्बॉल म्हटलं जाऊ लागलं. या चित्रपटातील नेहाच्या भूमिकेबद्दल एका मुलाखतीत विचारण्यात आले होते. यावर नेहा धुपिया म्हणाली होती की, ‘जुलीमध्ये अनेक लव्ह मेकिंग सीन आणि शॉट्स आहेत, ज्यामध्ये माझं शरीर दाखवण्यात आलं आहे. मला सेक्स सिम्बॉलचा टॅग लावायला हरकत नाही. ‘जुली’मध्ये असे काम करून मी मल्लिका शेरावत आणि बिपाशा बसू यांना मागे टाकले होते, असे लोक म्हणतात. याने मला काही फरक पडत नाही. आजच्या काळात एकतर सेक्स विकला जातो किंवा शाहरुख खान. त्यामुळे मला माझ्या पुढील पाच चित्रपटांमध्ये सेक्स प्रोप बनायला आवडेल, असं ती म्हणाली होती.

नेहा धुपियाने एका चॅट शोमध्ये पुन्हा तेच सांगितले होते. तसेच तिने सांगितले होते की शाहरुख खानने तिच्या स्वतःच्या चॅट शो #NoFilterNeha मध्ये हजेरी लावावी अशी तिची इच्छा आहे. एका मुलाखतीत याबाबत बोलताना नेहाने शाहरुखबद्दल असं का बोलली ते सांगितले. तिच्या मते, ‘मला वाटतं आजच्या काळात अनेक गोष्टी बदलत आहेत. पण एक गोष्ट आजही तशीच आहे ती म्हणजे सेक्स आणि शाहरुखची विकलं जातं.

Pathaan : पठाणचा जलवा चौथ्या दिवशीही कायम; 400 कोटींचा टप्पा पार

‘पठाण’ चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर, जगभरातून हा चित्रपट चांगली कमाई करत आहे. सर्वसामान्यांसोबतच बॉलीवूड सेलिब्रिटींनीही हे चित्रपटगृहांमध्ये जावून पाहिले आहे. नेहा धुपियानेही चित्रपट पाहिल्यानंतर ट्विटरवर त्याचे कौतुक केले. शाहरुख खानच्या कमबॅकने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

    follow whatsapp