मनिष जोग, जळगाव, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
जळगाव शहरातील शिवाजी नगर भागातून माया दिलीप फरसे ही 51 वर्षीय महिला दोन दिवसांपासून बेपत्ता होती. तिचा शोध पोलीस घेत असताना त्यांना जळगाव तालुक्यातील विदगाव शिवारातील जंगलात तिचा मृतदेह आढळला. जादूटोण्याच्या प्रकारातून या महिलेला तिच्या भाच्याने जिवंत जाळलं आहे. काळी जादू अर्थात ब्लॅक मॅजिक करत भाच्याने त्याच्या मामीला जिवंत जाळलं.
धक्कादायक ! चुगली करुन बदनामी करतो म्हणून मित्रांनीच केला मित्राचा खून
जळगाव जिल्ह्यातील शिरागड या ठिकाणी ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी संतोष मुळीक वय 30 आणि मृत महिलेचा भाचा अमोल दांडगे या दोघांनाही ताब्यात घेतलं आहे. मृत महिला जळगाव शहरातील सारथी पापड कारखान्यात काम करत होती. संतोष मुळीक हा स्वतःला मांत्रिक असल्याचं सांगतो. त्याने अमोल दांडगेला पैशांचा पाऊस पाडून दाखवतो असं सांगितलं. त्यासाठी तुला बळी द्यावा लागेल असंही सांगितलं. ज्यानंतर अमोल दांडगे त्याच्या मामीला म्हणजेच माया दिलीप फरसे यांना घेऊन या जंगलात आला. तिथे या महिलेला जाळण्यात आलं.
सुरुवातीला ताब्यात घेतलेल्या संतोष मुळीक आणि अमोल दांडगे या दोघांनीही खून केल्याचे कबूल करायला नकार दिला. दोघांना खाकीचा हिसका दाखवल्यावर त्यांनी घटनेची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष मुळीक हा मंत्रोपचार करतो. त्याच्या घरात हेच साहित्य मिळून आले. महिलेचा बळी दिला तर पैशाचा पाऊस पाडता येईल आणि त्यातून आपल्याला खूप पैसे मिळतील, असे संतोष याने अमोल याला सांगितले होते. त्यानुसार अमोल माया यांना घेऊन गेला होता. घनदाट झुडपात जाळल्यानंतर खोल खड्डयात या महिलेचा मृतदेह टाकून देण्यात आल्याचे समोर आले आहे.
जेवण गरम करुन दिलं नाही म्हणून डॉक्टर वहिनीची दिराकडून गोळी झाडून हत्या
सीसीटीव्ही फुटेजवरुन उलगडा
दोन दिवस उलटूनही महिलेचा शोध लागत नसल्याने पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याच्या सूचना पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार उपनिरीक्षक अरुण सोनार, पोलीस उपनिरिक्षक सर्जेराव क्षीरसागर, रतन गिते आणि भास्कर ठाकरे यांनी सोमवारी शिवाजी नगरातील फुटेज तपासले असता, माया ह्या त्यांचाच चुलत भाचा असलेल्या अमोल दांडगे याच्यासोबत जात असल्याचे दिसून आले. त्यांच्या एका हातात पिशवीही होती. हे फुटेज माया यांच्या पतीला दाखविले असता, त्यांनी दोघांना ओळखले. सीसीटीव्ही फुटेज आधारावरुन रतन गिते आणि भास्कर ठाकरे यांनी सर्वात आधी, सीसीटीव्हीत फुटेजमध्ये महिलेसोबत दिसून येणार्या अमोल याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून मांत्रिक संतोष मुळीक याची माहिती मिळाल्यावर त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
ADVERTISEMENT