जालना जिल्हा सरकारी रुग्णालयात एक दिवसाच्या नवजात बाळाचं एका अज्ञात महिलेने अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नवजात बाळाची काकू त्याला कोवळ्या उन्हात घेऊन उभी असताना आरोपी महिलेने संधी साधत, तुम्हाला पेशंटने आत बोलावलं आहे, तुम्ही जाऊन या. मी तोपर्यंत बाळाला सांभाळते.
ADVERTISEMENT
काकूने नवजात बाळाला आरोपी महिलेकडे सोपवलं असताना तिने संधी साधून रुग्णालयातून पळ काढला. पोलीस सीसीटीव्हीच्या मदतीने या महिलेचा शोध घेत आहेत.
रविवारी रात्री १० वाजल्याच्या दरम्यान जालना येथील पारेगाव येथे राहणाऱ्या रुखसानाला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रविवारी रात्रीच रुखसाना यांनी एका मुलाला जन्म दिला. मुलाची तब्येत चांगली असल्यामुळे सर्व कुटुंब चांगलंच आनंदात होतं. दुसऱ्या दिवशी रुखसानाची वहिनी हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी आली असता ती नवजात बाळाला हॉस्पिटलच्या आवारात कोवळ्या उन्हात घेऊन उभी होती.
याचदरम्यान, रात्रभर वॉर्डमध्ये फिरणाऱ्या एका महिलेने संधी साधत रुखलानाच्या वहिनीकडे जात, बाळाच्या आईला गरम पाणी हवंय, तुम्ही ते देऊन या. मी तोपर्यंत बाळाला सांभाळते असं सांगितलं. यानंतर रुखसानाची वहिनी वॉर्डात गेली असता आरोपी महिलेने संधी साधून बाळाला पळवलं होतं. यानंतर रुखसानाच्या नातेवाईकांनी शोधाशोध केली असता ती महिला पसार झाल्याचं लक्षात आलं. या घटनेसंदर्भात जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस सीसीटीव्ही आणि हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्यांच्या मदतीने या महिलेचा शोध घेत आहेत.
मुंबईत दुहेरी हत्याकांड, 89 वर्षीय वृद्धाने केली पत्नी आणि मुलीची गळा चिरून हत्या
ADVERTISEMENT