NPS ते आधार कार्ड… नव्या वर्षात ‘या’ महत्त्वाच्या नियमांमध्ये होणार बदल

मुंबई तक

• 05:44 AM • 01 Jan 2023

New Rules 2023: आजपासून नववर्षाची सुरूवात झाली आहे. 2022 वर्षाला निरोप देत 2023चे स्वागत जल्लोषात करण्यात आले. प्रत्येक नवीन महिना आपल्या जीवनात काही नवे बदल घेऊन येतो. काहीवेळेस या बदलांचा परिणाम आपल्या जीवनावर होताना दिसतो तर, काहीवेळेस थेट खिशावर होतो. २०२३ या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून काही महत्त्वाचे नियमही बदलले आहेत. यामध्ये क्रेडिट कार्ड, बँक […]

Mumbaitak
follow google news

New Rules 2023: आजपासून नववर्षाची सुरूवात झाली आहे. 2022 वर्षाला निरोप देत 2023चे स्वागत जल्लोषात करण्यात आले. प्रत्येक नवीन महिना आपल्या जीवनात काही नवे बदल घेऊन येतो. काहीवेळेस या बदलांचा परिणाम आपल्या जीवनावर होताना दिसतो तर, काहीवेळेस थेट खिशावर होतो. २०२३ या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून काही महत्त्वाचे नियमही बदलले आहेत. यामध्ये क्रेडिट कार्ड, बँक लॉकर्स, जीएसटी ई-इनव्हॉइसिंग, सीएनजी-पीएनजी किंमती आणि वाहनांच्या किमतींशी संबंधित बदलांचा समावेश आहे. (New Rules in 2023 Of Credit Card Bank Locker And Aadhar Card Related)

हे वाचलं का?

नवीन वर्ष 2023 मधील ‘या’ मोठ्या बदलांबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

NPSमधून पैसे काढणे होणार कठीण

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीने (PFRDA) दिलेल्या माहितीनुसार, एनपीएस म्हणजेच नॅशनल पेंशन सिस्टीमचे आंशिक पैसे काढण्याचे नियम आजपासून बदलणार आहेत. अंशतः पैसे काढण्यासाठी संबंधित नोडल अधिकाऱ्यांची संमती आवश्यक असेल. हा नियम केंद्र, राज्य आणि ऑटोनॉमस संस्थांच्या कर्मचाऱ्यांना लागू असेल.

बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे नुकसान झाल्यास बँका जबाबदार ठरणार नाहीत

बॅंक लॉकरशी संबंधित नियम आजपासून बदलणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक लॉकरशी संबंधित नवीन सूचना जारी केल्या आहेत. हे नियम 1 जानेवारी 2023 पासून म्हणजेच आजपासून लागू झाले आहेत. आता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूंचे नुकसान झाल्यास बँकेची जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. भूकंप, पूर, वीज बिघाड किंवा ग्राहकाच्या निष्काळजीपणासारख्या आपत्तींमुळे लॉकरमधील वस्तूंचे कोणतेही नुकसान झाल्यास बँक जबाबदार राहणार नाही. बँकेने लॉकरच्या नियमांमध्ये काही बदल केल्यास त्याची माहिती ग्राहकांना द्यावी लागेल.

रेफ्रिजरेटर आणि सिलिंग फॅन महागणार

आजपासून ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीचे (BEE) नियम बदलत आहेत. याचा परिणाम दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या वस्तूंवर होईल. हा नियम लागू झाल्यानंतर रेफ्रिजरेटर 2 ते 5 टक्क्यांनी महाग होतील. सीलिंग पंखे नियमांतर्गत देशात स्टार लेबलिंगनेच येतील, ज्यामुळे त्यांच्या किमतींवर परिणाम होईल.

क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉइंटचे नियम बदलले

HDFC बँकेच्या क्रेडिट कार्ड पेमेंटवर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंटशी संबंधित नियम आजपासून बदलतील. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून, HDFC बँक त्यांच्या क्रेडिट कार्ड पेमेंटवर उपलब्ध रिवॉर्ड पॉइंट्स बदलणार आहे.

वाहन खरेदी महागणार

नवीन वर्ष 2023 मध्ये नवीन वाहने खरेदी करणे महागडे ठरू शकते. काही ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. नवीन वर्षात नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर, ते महाग ठरू शकते.

120 मायक्रॉनपेक्षा पातळ प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, आजपासून 120 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक कॅरीबॅगवर पूर्ण बंदी असेल. सध्या ही बंदी ७५ मायक्रॉनपेक्षा पातळ असलेल्या प्लास्टिकच्या कॅरीबॅगवर लागू आहे.

सोसायटीच्या टेरेसवर New Year सेलिब्रेशनची तयारी करताय? होऊ शकते कारवाई…

आधारशी कार्ड लिंक न केल्यास पॅन कार्ड निष्क्रिय होणार

आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च अखेरपर्यंत आणि 1 एप्रिल 2023 पासून आधार कार्ड, पॅन कार्डशी लिंक न केल्यास ते निष्क्रिय करण्यात येणार आहे. पॅन आधारशी लिंक करणे अनिवार्य ठरेल. निष्क्रिय होईल.

    follow whatsapp