महाराष्ट्रात आज १० हजार २०१६ नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर आज राज्यात ५३ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा २.३८ टक्के इतका आहे. मागील २४ तासांमध्ये ६ हजार ४६७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत राज्यात एकूण २० लाख ५५ हजार ९५१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामुळे राज्यातील रूग्ण वाढण्याचे प्रमाण ९३.५२ टक्के इतके झाले आहे.
ADVERTISEMENT
आजवर तपासण्यात आलेल्या १ कोटी ६६ लाख ८६ हजार ८८० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१ लाख ९८ हजार ३९९ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख १० हजार ४११ व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर ४ हजार २०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे.
राज्यात आज घडीला ८८ हजार ८३८ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. आज राज्यात १० हजार २१६ नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोना रूग्णांची संख्या २१ लाख ९८ हजार ३९९ इतकी झाली आहे. आज नोंद झालेल्या ५३ मृत्यूंपैकी २८ मृत्यू हे मागी ४८ तासांमधले आहेत. तर १६ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित ९ मृत्यू हे ठाणे-५, गडचिरोली २, अहमदगनर १ आणि पुणे १ असे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरं आणि अॅक्टिव्ह रूग्णांची संख्या
मुंबई ९ हजार ५५
ठाणे ९ हजार ५७९
पुणे १८ हजार ४०१
सोलापूर १ हजार ७०
नाशिक २ हजार ८४०
औरंगाबाद ३ हजार ४२४
अमरावती ५ हजार २६०
अकोला ४ हजार ४११
बुलढाणा १ हजार ७५१
नागपूर ११ हजार ५५२
अॅक्टिव्ह रूग्णांच्या दृष्टीने विचार करता आज पुणे आणि नागपूर या दोन शहरांमध्ये सर्वाधिक अॅक्टिव्ह रूग्ण आहेत. पुण्यात १८ हजारांपेक्षा जास्त तर नागपुरात ११ हजारांपेक्षा जास्त रूग्ण आहेत. ही बाब दोन्ही शहरांच्या दृष्टीने काळजीत भर घालणारीच आहे.
ADVERTISEMENT