नांदेड जिल्ह्यातील हिमायत नगर ते भोकर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. लग्नाचं वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या पिकअप ऑटो आणि ट्रकचा भीषण अपघात झाला, ज्यात अवघ्या तीन दिवसांपूर्वी लग्न झालेल्या तरुणीचा मृत्यू झाला आहे. लग्नानंतर ही तरुणी आपल्या भावासोबत माहेरपणाला जात असताना तिच्यावर काळाने घाला घातला आहे. या अपघातात ६ जणं गंभीर जखमी झाले असून यात विवाहीत तरुणीच्या पतीचाही समावेश आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप ऑटो भोकरवरुन हिमायत नगरकडे जात होती. याचवेळी ट्रक हा हिमायत नगरवरुन भोकरच्या दिशेने येत होता. सोमाठाणा गावाजवळ ही दोन्ही वाहनं भरधाव वेगात असताना एकमेकांवर आदळली. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की ट्रक धडक झाल्यानंतर पलटी होऊन शेतात पडला तर पिकअप ऑटोमध्ये असणाऱ्या पाच जणांचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातात मृत पावलेल्या विवाहीत तरुणीचं नाव पुजा पालमवार असं असून ती आपला भाऊ दत्ता पालमवारसोबत माहेरपणाला यवतमाळला जात होती.
या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. जखमी झालेल्या सहा जणांवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
टिटवाळ्याच्या तरुणाने वाशीच्या खाडीत घेतली उडी;
टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण आलं समोर
ADVERTISEMENT