सध्या एका जाहिरातीचा विषय सोशल मीडियाच नव्हे तर सगळीकडेच रंगला आहे. वृत्तपत्रात आलेली ही जाहिरात पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. कोणत्याही जाहिरातीचा उद्देश हा असतो की ते आपलं लक्ष चटकन वेधून घेतात. या जाहिरातीने ते घेतलं आहे. याचं कारण आहेत पंतप्रधान मोदी आणि 500 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक.
ADVERTISEMENT
काय आहे जाहिरातीत?
या जाहिरातीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना परवानगी मागणारं एक पत्र आहे. भारतात 500 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करतो मला भेटीची वेळ द्या अशी संमती मागणारं एक पत्र जाहिरातीत आहे. इतक्या मोठ्या रकमेची गुंतवणूक करायची आहे असं म्हणणारी कंपनी कुठली आहे? काय करते? याचा आम्ही शोध घेतला. Landomus Realty Ventures Inc, USA असं या कंपनीचं नाव आहे.
National Infrastructure Pipeline (NIP) and Non-NIP प्रकल्पांमध्ये आमची गुंतवणूक करण्याची इच्छा आहे असं या जाहिरातीत स्पष्ट करण्यात आलं आहे. ही गुंतवणूक थोडी थोडकी नाही तब्बल 500 बिलियन डॉलर्सची आहे.
ही कंपनी काय आहे? याचा शोध आम्ही घेतला तेव्हा लक्षात आलं की Landomus Realty Ventures ही एक खासगी कंपनी आहे. 17 जुलै 2015 पासून ही कंपनी असल्याचं लक्षात येतं आहे.
कंपनीच्या आर्थिक ताळेबंदाची, कामगिरीची कुठलीच माहिती वेबसाईटवर नाही
झूम इन्फोनुसार कंपनीत एकूण कर्मचारी आहेत 19, आणि उलढाल 5 मिलियन डॉलर असल्याचा दावा
पाच वर्ष जुन्या या कंपनीची शेवटची AGM झाली होती 2018 मध्ये, गेल्या तीन वर्षात कुठली बॅलन्स शीट नाही
अमेरिकन फर्म असल्याचा दावा जाहिरातीत आहे, पण बहुतांश डायरेक्टर भारतीयच दिसत आहेत.
या कंपनीला भारतात थोड्या थोडक्या नाही तर 500 बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करायची आहे. या कंपनीच्या संकेत स्थळावर मिळालेल्या माहितीनुसार या कंपनीचं शेअर कॅपिटल Rs 1,000,000 इतकं आहे तर. पेड अप कॅपिटल Rs 100,000 इतकं आहे. या कंपनीचे चेअरमन प्रदीप कुमार यांच्याबद्दलही फार कमी माहिती सार्वजनिकपणे उपलब्ध आहे. ज्या डायरेक्टरची नावं वेबसाईटवर आहेत, त्याचं Linkedin प्रोफाईल आहे, त्यावरुन ते बंगळुरू, कर्नाटकमधले असल्याचं दिसतं आहे.
या जाहिरातीची सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. तसंच अनेक लोक या जाहिरातीच्या सत्यतेवरही प्रश्न उपस्थित करू लागले आहेत. जर एखाद्या उद्योजकाला किंवा कंपनीला 500 बिलियन डॉलर्स भारतात गुंतवणूक करायची आहे आणि त्यासाठी पंतप्रधान मोदींची संमती हवी आहे तर त्यासाठी अशी जाहिरात देण्याची पद्धत आहे का? असाही प्रश्न नेटकरी आणि सोशल मीडियावर विचारला जातो आहे.
ADVERTISEMENT