संसदेत कोकणाची अब्रू घालवणाऱ्यांनी नारायण राणे कसे चुकले होते त्यावर बोलू नये असं निलेश राणेंनी विनायक राऊत यांना सुनावलं आहे. लोकसभेत एका प्रश्नला उत्तर देताना नारायण राणे अडखळल्याचा व्हीडिओ शिवसेनेने व्हायरल केला आहे. तसंच खासदार विनायक राऊत यांनी या भाषणाची खिल्ली उडवली आहे. त्यावरून आता भाजपचे प्रदेश सरचिटणीस निलेश राणे आक्रमक झाले आहेत.
ADVERTISEMENT
नारायण राणे यांच्याकडे सूक्ष्म आणि लघू उद्योग, सरकार पाडणं मोठा उद्योग; संजय राऊत यांचा टोला
काय म्हणाले आहेत निलेश राणे?
अर्ध मराठी, अर्ध हिंदीतू बोलून महाराष्ट्राची आणि कोकणाची अब्रू तुम्ही दिल्लीत घालवली. तुम्हाला कधी बाळासाहेब ठाकरेंनी किंवा उद्धव ठाकरेंनी मंत्री केलं आहे? तुम्ही नारायण राणेंवर बोलत आहात. पण लक्षात ठेवा ते मुख्यमंत्री होते आता केंद्रात मंत्री आहेत. जे संसदेत धड बोलू शकत नाहीत ते नारायण राणेंवर कसे काय बोलतात? असा प्रश्न उपस्थित करत निलेश राणेंनी विनायक राऊत यांना खडे बोल सुनावले आहेत.
नारायण राणे यांचं मोठं वक्तव्य; ‘नववर्षात महाराष्ट्रात भाजपचं सरकार’
काय म्हणाले होते विनायक राऊत?
लोकसभेत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या खात्याअंतर्गत प्रश्न होता. डीएमकेच्या खासदार कनीमोळी यांनी तो प्रश्न इंग्रजी भाषेत विचारला होता. लोकसभेत बोलण्याची राणेंची पहिलीच वेळ होती. अभ्यास तेवढा झाला की नाही माहिती नाही. त्यामुळे उत्तर देत असताना त्यांनी त्यांच्या पद्धतीने उत्तर दिले. यावर फार काही टीकाटिप्पणी करणार नाही. जेवढा महाराष्ट्र सोपा आहे. तेवढी देशाची संसद सोपी आहे असं कुणी समजू नये. स्वाभिमान पक्षाचे काही लोक हे विकृतीने पछाडलेले आहेत. त्यामुळे त्यांना हिंदी काय, इंग्रजी काही भाषेचा संबंध नसतो. मराठीही नाही. त्यामुळे कुठे ना कुठे घाण करायची अशा पद्धतीने त्यांचं काम आहे. लोकसभेत मला सुद्धा प्रश्न विचारता आला असता. पण ते आपलेच गाववाले आहेत, आपण दुर्लक्ष करायाला पाहिजे असं म्हणत उपरोधिक टोला राऊत यांनी लगावला आहे. ते आज सिंधुदुर्गत बोलत होते.
विनायक राऊत यांनी केलेल्या टीकेला निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच विनायक राऊत यांना साधं राज्यमंत्रीही कोणी केलं नाही असाही टोला लगावला आहे.
ADVERTISEMENT