देशातल्या टोल नाक्यांबाबत नितीन गडकरी यांनी केली मोठी घोषणा, म्हणाले….

मुंबई तक

• 11:03 AM • 18 Mar 2021

देशातल्या टोल नाक्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. देशातले सगळे टोलनाके वर्ष भरात हटवण्यात येतील असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशातले सगळे टोलनाके वर्षभरात हटवण्यात येणार असून जीपीएसवर आधारीत टोलवसुली प्रणाली राबवण्यात येईल असं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे. “मी हे सांगू इच्छितो की येत्या वर्षभरात देशातले […]

Mumbaitak
follow google news

देशातल्या टोल नाक्यांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. देशातले सगळे टोलनाके वर्ष भरात हटवण्यात येतील असं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं आहे. देशातले सगळे टोलनाके वर्षभरात हटवण्यात येणार असून जीपीएसवर आधारीत टोलवसुली प्रणाली राबवण्यात येईल असं नितीन गडकरींनी स्पष्ट केलं आहे. “मी हे सांगू इच्छितो की येत्या वर्षभरात देशातले सगळे टोलनाके हटवले जातील. याचा अर्थ टोलवसुली ही जीपीएसच्या माध्यमातून केली जाईल. जीपएसद्वारे काढण्यात येणाऱ्या फोटोंच्या माध्यमातून टोल घेतला जाईल” असं नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

उत्तर प्रदेशातील अमरोहा या मतदार संघातील बसपा खासदार कुंवर दानिश अली यांनी टोलचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्द्यावर नितीन गडकरी यांनी उत्तर दिलं आहे. टोलनाक्यांवर मलई खाण्यासाठी छोटे-छोटे टोल उभारण्यात आले असं म्हणत नितीन गडकरी यांनी यूपीए सरकारवर निशाणा साधला.

नितीन गडकरी यांनी यावेळी फास्टटॅगच्या माध्यमातून टोल न भरणाऱ्या वाहनांची पोलीस चौकशी करण्याचा आदेश दिला आहे अशीही माहिती त्यांनी दिली. वाहनांना फास्टटॅग नसल्यास टोल आणि जीएसटी चोरी केल्याचा गुन्हाही दाखल करम्यात येईल. फास्टटॅगच्या माध्यमातून टोल नाक्यांवर इलेक्ट्रॉनिक पेमेंटला चालना देण्यात आली आहे. १६ फेब्रुवारीपासून फास्टटॅग अनिवार्य करण्यात आला आहे. त्याशिवाय प्रवास करणाऱ्या वाहनांना दुप्पट टोल भरावा लागतो आहे.

    follow whatsapp