‘त्या’ ऑफरवर नितीन गडकरी म्हणाले, ‘विहिरीत उडी मारून जीव देईन, पण काँग्रेसमध्ये येणार नाही’

मुंबई तक

29 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:48 AM)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कामाबरोबरच भाषणामुळेही चर्चेत असतात. अलिकडेच नितीन गडकरींची नागपुरात मुलाखत झाली. या मुलाखतीत नितीन गडकरींनी विद्यार्थी दशेतील त्यांची आठवण सांगितली. काँग्रेसकडून आलेली ऑफर नाकारल्याचं कारणही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. त्याचबरोबर ‘वापरा आणि फेकून द्या’ अशी वृत्ती न ठेवता माणस जपण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. नितीन गडकरींनी सांगितला खऱ्या यशाचा अर्थ मुलाखतीत […]

Mumbaitak
follow google news

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे कामाबरोबरच भाषणामुळेही चर्चेत असतात. अलिकडेच नितीन गडकरींची नागपुरात मुलाखत झाली. या मुलाखतीत नितीन गडकरींनी विद्यार्थी दशेतील त्यांची आठवण सांगितली. काँग्रेसकडून आलेली ऑफर नाकारल्याचं कारणही त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. त्याचबरोबर ‘वापरा आणि फेकून द्या’ अशी वृत्ती न ठेवता माणस जपण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं.

हे वाचलं का?

नितीन गडकरींनी सांगितला खऱ्या यशाचा अर्थ

मुलाखतीत बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “जेव्हा तुम्हाला यश मिळत आणि त्याचा आनंद फक्त तुम्हाला एकट्यालाच होत असेल, तर ते अर्थहीन आहे. पण जेव्हा तुम्हाला यश मिळत, आनंद होतो. त्याचा आनंद तुमच्यासोबत काम करणाऱ्यांना तुमच्यापेक्षा जास्त आनंद होतो, तो यशाचा खरा अर्थ आहे.”

‘अधिकाऱ्याला म्हणालो, मंत्रीपद गेलं तरी मला फरक पडत नाही’; नितीन गडकरींनी सांगितला किस्सा

नितीन गडकरी : ‘वापर आणि फेकून द्या’, ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ असं करू नका

“मी एक गोष्ट सांगेन की कोणत्याही व्यवसायाचा, सामाजिक कार्याचा आणि राजकारणाचं सदृढ मानवी नातेसंबंध हे शक्तीस्थान आहे. त्यामुळे कधीही ‘यूज अॅण्ड थ्रो’वालं (वापरा आणि फेकून द्या) काम केलं नाही पाहिजे. चांगले दिवस असो की वाईट, ज्याचा हात एकदा पकडला आहे, तर पकडूनच ठेवा. परिस्थितीनुसार उगवत्या सूर्याला नमस्कार असं करू नका. मानवी नातेसंबंध ही सगळ्यात मोठी ताकद आहे.”

विहिरीत जीव देईन, पण काँग्रेसमध्ये येणार नाही, असं का म्हणाले होते गडकरी?

काँग्रेस नेत्याने दिलेल्या ऑफरचा किस्सा नितीन गडकरींनी सर्वांना सांगितला. “दुसरी गोष्ट म्हणजे… मी नागपूरमध्ये काम करायचो. विद्यार्थी नेता होतो. त्यावेळी श्रीकांत जिचकार म्हणून होते. खूप हुशार होते. एक दिवस ते मला म्हणाले, ‘नितीन, तू खूप चांगला व्यक्ती आहेस. तुला खूप चांगलं राजकीय भविष्य आहे, पण तू चुकीच्या पक्षात आहेस. तू काँग्रेसमध्ये ये.’ त्यावर मी त्यांना म्हणालो, मी विहिरीत जीव देईन, पण काँग्रेसमध्ये येणार नाही. मला काँग्रेसची विचारधारा आवडत नाही. ते म्हणाले, ‘तुझ्या पक्षाला काही भविष्य नाहीये.’ मी त्यांना म्हणालो, ‘नाहीये, तर नाहीये”, असं नितीन गडकरी म्हणाले.

Nitin Gadkari पुढच्या निवडणुकीसाठी सज्ज, मत द्यायचं तर द्या नाहीतर…

नितीन गडकरींना मित्राने दिलं होतं पुस्तक

“त्यावेळी माझा एक मित्र आयआयटीमध्ये होता. आम्ही लोक निवडणुका हरायचो. तर त्याने मला एक पुस्तक दिलं होतं. ते रिर्चड निक्सन यांचं आत्मचरित्र होतं. त्यात एक खुपच सुंदर वाक्य होतं. जे मी आयुष्यभर लक्षात ठेवलं. जे माझ्यासाठी उपयोगी होतं आणि तुमच्यासाठीही असेल. त्याने असं म्हटलेलं की, ‘माणूस पराभवाने संपत नाही, तर तो जेव्हा सोडून देतो, तेव्हा तो संपतो.’ युद्धभूमीवर पराभूत झाल्यानंतर माणूस संपत नसतो. पण तो युद्धभूमी सोडून जातो, तेव्हा तो संपतो. त्यामुळे लढलं पाहिजे. त्यासाठी सकारात्मकता हवी. अहंकार आणि आत्मविश्वास या दोन शब्दांमध्ये अंतर आहे. आत्मविश्वास असायला पाहिजे. सकारात्मकता असली पाहिजे, पण अहंकार आणि अभिनिवेश नको”, असे धडे नितीन गडकरींनी उपस्थितांना दिले.

नितीन गडकरींचा पुन्हा भाजपला घरचा आहेर, संसदीय बोर्डातून हटवल्यानंतर पहिल्यांदाच बोलले

पुढे बोलताना नितीन गडकरी म्हणाले, “सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुणीही परिपूर्ण नाहीये आणि कुणीही आपण परिपूर्ण असल्याचा दावा करू शकत नाही. लहान लहान लोकांकडून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात. चांगल्या गोष्टींवर कुणाचंही पेटंट नाहीये, असं मी मानतो. आपल्याच मित्रांसोबत बोलताना आपल्याला शिकायला मिळतात. त्या आपण आपल्या व्यक्तिमत्त्वात आणू शकलो, तर स्वतःला सुधारण्याची ती चांगली प्रक्रिया आहे.”

    follow whatsapp