मुसळधार पावसाने झोडपून काढलेल्या कोल्हापूरसमोर आता आणखी एक संकट निर्माण झालं आहे. कोल्हापूर महापालिकेच्या बालिंगा पंपिंग हाऊसमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे हे पंपिंग हाऊस बंद पडलंय. त्यामुळे कोल्हापूरवासियांनी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद राहणार आहे.
ADVERTISEMENT
जोपर्यंत पंपिंग हाऊसमधल्या पाण्याचा निचरा होत नाहीत तोपर्यंत शहरात नळाद्वारे पाणीपुरवठा केला जाणार नाही असं स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे या काळात संपूर्ण शहराला पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर अवलंबून रहावं लागणार आहे. पाणीपुरवठा बंद झाल्यामुळे नागरिकांचे चांगलेच हाल होताना दिसत आहेत.
NDRF… संकटातील आशेचा किरण, देवदूतच म्हणा ना!
दरम्यान शहरात घुसलेलं पंचगंगा नदीचं पाणि अद्याप ओसरलेलं नसून पुणे-बंगळुरु महामार्गावर पुराचं पाणी पहायला मिळतंय. या रस्त्यावर पाणी साचल्यामुळे अनेक वाहनांचा खोळंबा झालेला पहायला मिळाला. कोल्हापूर शहरातील, व्हीनस कॉर्नर, लक्ष्मीपूरी,स्टेशन रोड, कलेक्टर ऑफिस परिसर, न्यू पॅलेस परिसर, महावीर कॉलेज रोड, या परिसर मध्ये अद्यापही सात ते आठ फूट पाणी आहे.
कोल्हापूर, चिखली, आंबेवाडी, यासह शिरोळ तालुक्यात देखील एनडीआरएफ, व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन च्या वतीने अनेक नागरिकांना त्यांच्या घरातून सुरक्षीत बाहेर काढण्याचं काम देखील सुरु आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी काल मध्यरात्री बारा वाजता ५६ फुटांपर्यंत पोचली होती. काल मध्यरात्रीपासून पाऊस थांबलेला आहे त्यामुळे आत्ता पंचगंगा नदीची पाणीपातळी ५४ फुटांपर्यंत आहे. त्यामुळे कोल्हापूरचं जनजीवन आता रुळावर कधी येतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
Satara मधील आंबेघरमध्ये मोठी दुर्घटना, 3 जणांचे मृतदेह हाती; तब्बल 39 जण बेपत्ता
ADVERTISEMENT