उच्चभ्रू सोसायटीतील एक महिला कारमधून उतरून सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. महिला सुरक्षा रक्षकाला अर्वाच्य शिव्या देताना दिसत आहे. त्याचबरोबर त्यांची शर्टची कॉलर पकडतानाही दिसत आहे. त्यामुळे दोन दिवसांपासून महिलेची सोशल मीडियावर चर्चा सुरूये…नोएडातल्या Jaypee Wishtown Society मध्ये ही घटना घडली.
ADVERTISEMENT
सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करत असलेल्या महिलेचा व्हिडीओ आहे नोएडातील. नोएडातील जेपी विशटाऊन सोसायटीत हा सगळा प्रकार घडला आहे. जेपी विशटाऊन सोसायटी सेक्टर १२६ मध्ये आहे.
सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करणाऱ्या महिलेचं नाव काय? ती काय करते?
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ करणाऱ्या महिलेचं नाव आहे भव्या रॉय! भव्या रॉय जेपी सोसायटीत भाडेकरू आहे. आरोपी महिला पेशाने वकील आहे. महत्त्वाचं म्हणजे दक्षिण दिल्लीतील साकेत न्यायालयात ती वकिली करते.
आरोपी महिलेने पोलिसांनी केलेल्या चौकशी दिलेल्या माहितीप्रमाणे तिचं लग्न झालेलं आहे. भव्या रॉयचा विवाह २०१६ मध्ये झालेला असून, तिच्या पतीचं नाव कौस्तुभ चौधरी असं आहे. भव्या रॉय मूळची दिल्लीतील महरौली येथील आहे. तीन महिन्यांपूर्वी तिने जेपी विशटाऊन सोसायटीमध्ये भाड्याने फ्लॅट घेतला.
सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी Bhaavya Roy महिलेविरुद्ध काय कारवाई करण्यात आलीये?
सोसायटीच्या गेटवरील सुरक्षा रक्षकाला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करणाऱ्या भव्या रॉयविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. नोएडा सेक्टर १२६ पोलीस ठाण्यात आरोपी भव्या रॉयविरुद्ध गुन्हा (भादंवि कलम १५३-ए, ३२३, ५०४, ५०५(२), ५०६ अन्वये) दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर नोएडा पोलिसांनी आरोपी भव्या रॉय या महिलेला अटक केलं. त्यानंतर या महिलेला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. न्यायालयाने भव्या रॉयला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
महिलेनं शिवीगाळ का केली?
ज्या सुरक्षा रक्षकाला भव्या रॉयने शिवीगाळ केली. त्याने घडलेला प्रसंग सांगितला. ‘गेटवर गाडी चेक करत होतो. गेटवर एक गाडी आधीच उभी होती. त्या गाडीच्या मागे महिलेची (भव्या रॉय) गाडी मागे होती. मी त्यांना जाऊन सांगितलं की वेळ लागेल. त्यानंतर महिला भडकली आणि शिव्या द्यायला लागली. गाडीमधून उतरली. महिला नशेत होती. त्यांनी माझ्या सुपरवायझरसोबतही चुकीचं वर्तन केलं. माझा गणवेशही फाडला.’
ADVERTISEMENT