नोरा फतेहीचं ‘बस इट डाउन’ चॅलेंज सोशल मीडियावर व्हायरल

मुंबई तक

• 08:07 AM • 09 Apr 2021

डान्सद्वारे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोरा तिच्या डान्सच्या मूव्हमुळे कमी वेळातच लोकप्रिय झाली. नुकतंच नोराने एक व्हिडीयो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडियोमध्ये ‘बस इट डाउन’ हे चँलेंज स्विकारलंय. दरम्यान नोराचा हा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला आहे. नोराने हे चॅलेंज उत्तम पद्धतीने केलं असून तिच्या फॅन्सना देखील ते फार आवडलंय. […]

Mumbaitak
follow google news

डान्सद्वारे लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे नोरा फतेही. नोरा तिच्या डान्सच्या मूव्हमुळे कमी वेळातच लोकप्रिय झाली. नुकतंच नोराने एक व्हिडीयो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडियोमध्ये ‘बस इट डाउन’ हे चँलेंज स्विकारलंय. दरम्यान नोराचा हा व्हिडीयो चांगलाच व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

नोराने हे चॅलेंज उत्तम पद्धतीने केलं असून तिच्या फॅन्सना देखील ते फार आवडलंय. तिच्या या व्हिडीयोवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडलाय. नोराचं हे रील केवळ एका दिवसात 11 मिलियन्सहून अधिक वेळा लोकांनी पाहिलं आहे.

सध्याच्या घडीला नोरा बॉलिवूडमधील आघाडीची डान्सर आहे. नोराच्या डान्सची ख्याती केवळ भारतात नाही तर इतर देशांमध्येही पसरली आहे. नोराच्या प्रत्येक डान्सचा व्हिडीयो हीट होत असतो. तसंच तिच्या सोशल मीडियावरील फोटोंना देखील फॅन्सचा भरभरून प्रतिसाद मिळतो.

नुकतंच एका अवॉर्ड फंक्शनसाठी केलेला नोराचा लूक सर्वांना फार आवडला आहे. या फंक्शनसाठी नोराने घातलेल्या ड्रेसची ही सगळीकडे चर्चा झाली होती. साता समुद्रापारहून नोराचा हा ड्रेस डिझाईन होऊन आला होता. हॉलिवूड सुपरस्टार्स जेनिफर लोपेझ, ब्रिटनी स्फेअर आणि पॅरिस हिल्टन यांनी ड्रेसच्या ओव्हर ऑल लूक डिझाइन केलेला. नोरा ही पहिली भारतीय अभिनेत्री आहे जिच्यासाठी हॉलिवूडच्या सुपरस्टार डिझायनरने खास ड्रेस डिझाइन केला होता.

    follow whatsapp