Tripura, Meghalaya, Nagaland Election Results 2023 : त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांचे निकाल हाती आले आहेत. या निकालात त्रिपुरामध्ये (Tripura) भाजपाने पुनरागमन केले आहे. नागालँडमध्ये (Nagaland)एनडीपीपी-भाजप युतीची जादू कायम राखली आहे. तर मेघालयात (Meghalaya) कॉनरॉड संगमा यांच्या नेतृत्वाखाली एनपीपीने सर्वाधिक 26 जागा जिंकल्या असून त्यांनी भाजपसोबत युती करून सत्ता स्थापनेची तयारी केली आहे. आता या तीन राज्यातील निकाल नेमका कसा लागलाय हे जाणून घेऊयात. (north east assembly election result tripura nagaland bjp won Meghalaya NPP ready for alliance with BJP)
ADVERTISEMENT
त्रिपुरात भाजप-आयपीएफटीने बहुमत गाठलं
त्रिपुरात भाजप-आयपीएफटी (इंडिजियस पीपल फ्रंट ऑफ त्रिपुरा) (BJP-IPFT)पार्टी पुन्हा एकदा सत्तेत आली आहे. कारण या निवडणूकीत भाजप-आयपीएफटीने 33 जागा जिंकत बहुमत गाठलं आहे. डाव्यांना (Left) या निवडणूकीत 14 तर टीपरा मोठा पार्टीला 13 जागा जिंकला आल्या. 60 जागांवर पार पडलेल्या या निवडणुकीत मॅजिक फिगर 31 होता. हा मॅजिक फिगर भाजप-आयपीएफटीने सहज गाठत बहुमत सिद्ध केलं. त्यामुळे निवडणुकीच्या निकालावरून त्रिपुरात पुन्हा एकदा भाजप-आयपीएफटी पुन्हा सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Ramdas Athawale यांचा ईशान्येत करिश्मा; नागालँडमध्ये RPI(A) दोन जागांवर विजयी
मेघालयात कॉग्रेस-बीजेपी सपशेल अपयशी
मेघालयातही 60 जागांवर निवडणुक पार पडली होती. या निवडणुकीत मुख्यमंत्री कॉनरॉड संगमा यांच्या नेतृत्वाखाली एनपीपीने (नेशनल पीपल्स पार्टी) सर्वाधिक 26 जागा जिंकल्या आहेत.त्यानंतर इतर पक्षांनी 25 जागा जिंकल्या आहेत. कॉग्रेस आणि बीजेपी सारख्या बड्या पार्ट्यांचा या निवडणुकीत काहीच निभाव लागला नाही. कारण कॉग्रेस 5 आणि भाजपच्या 3 जागा आल्या आहेत. मेघालयात 31 हा मॅजिक फिगरचा आकडा आहे. एनपीपीकडे 26 जागा आहे. तर एनपीपी भाजपसोबत युती करणार असल्याची चर्चा असल्याने त्यांच्या 3 जागा मिळून 29 जागाच होत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आणखीण 2 जागांची गरज असणार आहे. त्यामुळे इतर पक्षातील दोन जागा मिळवून त्यांना सत्ता स्थापन करता येणार आहे.
नागालॅंडमध्ये पवारांचा चमत्कार; विधानसभेत राष्ट्रवादीचा विरोधी पक्ष नेता
नागालॅंडमध्ये भाजप-एनडीपीपीची सत्ता
नागालॅंडमध्ये भाजप-एनडीपीपीने (नेशनल डेमोक्रेटीक प्रोग्रेसिव्ह पार्टी) 37 जागा जिंकून बहुमताचा आकडा गाठला आहे. 60 जागावर पार पडलेल्या निवडणुकीत 31 हा मॅजिक फिगरचा आकडा होता. भाजप-एनडीपीपीने 37 जागा जिंकून हा मॅजिक फिगर सहज गाठत सत्ता स्थापनेची तयारी सुरू केली आहे. नागालॅंडमध्ये कॉग्रेसला खातं देखील उघडता आले नाही आहे. तर एनपीफने 2 आणि इतर पक्षानी 21 जागा जिंकल्या आहेत.
दरम्यान या तीन राज्याच्या निवडणूकीत त्रिपुरात भाजप पुन्हा एकदा सत्तेवर आले आहे. नागालँडमध्ये एनडीपीपी-भाजप युतीची जादू कायम राखली आहे. तर मेघालयात एनपीपीने सर्वाधिक 26 जागा जिंकल्या असून त्यांनी भाजपसोबत युती करून सत्ता स्थापनेची तयारी केली आहे.
ADVERTISEMENT