गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार झालेल्या कुख्यात गुंड बाळा दराडेला बारामती पोलिसांनी जेरबंद केलंय. बारामती पोलिसांच्या विशेष गुन्हे शाखेच्या शोध पथकाने नाशिकमध्ये जाऊन ही कारवाई केली आहे. दराडे याने सातारा, पुणे, सोलापूर, अहमदनगर या परिसरात आपली दहशत माजववी होती. पिस्तुलांची तस्करी करुन युवकांना गुन्हेगारी क्षेत्रात आणण्याचं काम बाळा दराडे गेल्या काही वर्षांपासून करायचा. याच जोरावर त्याने आपली दहशत निर्माण केली होती.
ADVERTISEMENT
एमआयडीसीतले व्यापारी, उद्योजगांना धमकावून त्यांच्याकडून खंडणी वसून करणं, चोरी, दरोडा, मारमारी असे अनेक गंभीर गुन्हे बाळा दराडेविरोधात दाखल झाले होते. पुणे जिल्ह्यातील इंदापूर आणि भिगवण भागातही बाळा दराडेविरोधात अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र यापैकी एकाही गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आलेली नव्हती. गेल्या तीन वर्षांपासून बाळा दराडे पोलिसांना चकवा देत राज्याच्या विविध भागांत लपून रहायचा. अखेरीस बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गव्हाण यांना बाळा दराडे नाशिकमध्ये एका आश्रिताच्या मदतीने राहत असल्याची माहिती मिळाली.
मिळालेल्या माहितीवरुन बारामती पोलिसांच्या पथकाने नाशिकमध्ये धडक कारवाई करत बाळा दराडेला बेड्या ठोकल्या आहेत. गेल्या ३ वर्षांपासून फरार असलेल्या बाळा दराडेची माहिती देण्यासाठी पोलिसांनी ५० हजाराचं इनाम जाहीर केलं होतं. यानंतर अखेरीस दराडे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. या कामगिरीत पोलीस निरीक्षक महेश ढवाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगोटे, पोलीस कर्मचारी विजय पांढरे, विजय वाघमोडे, नंदू जाधव, विनोद लोखंडे यांनी सहभाग घेतला होता.
आरोपीला पळवून नेण्यासाठी पोलीस ठाण्यावर दगडफेक, धुळ्यातील दोंडाईचा येथील घटना
ADVERTISEMENT