अब तक 14… एक-दोन नव्हे तर तब्बल 14 महिलांशी लग्न, लग्नाचा ‘WORLD RECORD’ पण..

मुंबई तक

• 09:24 AM • 15 Feb 2022

भुवनेश्वर (ओडिशा): सध्याच्या काळात एक संसार निभावणं हे अनेकांना अवघड जात आहे. तर दुसरीकडे भारतात एक अशी व्यक्ती आहे ज्याने एक, दोन नव्हे तर तब्बल 14 लग्नं केली असल्याचं समोर आलं आहे. ओडिशातील एका व्यक्तीने चक्क ‘लग्नाचा विक्रम’ केला आहे. त्याने एकूण 14 लग्नं केली आहेत आणि ती देखील 7 वेगवेगळ्या राज्यांमध्ये. पण आता याच […]

Mumbaitak
follow google news

भुवनेश्वर (ओडिशा): सध्याच्या काळात एक संसार निभावणं हे अनेकांना अवघड जात आहे. तर दुसरीकडे भारतात एक अशी व्यक्ती आहे ज्याने एक, दोन नव्हे तर तब्बल 14 लग्नं केली असल्याचं समोर आलं आहे. ओडिशातील एका व्यक्तीने चक्क ‘लग्नाचा विक्रम’ केला आहे. त्याने एकूण 14 लग्नं केली आहेत आणि ती देखील 7 वेगवेगळ्या राज्यांमध्ये. पण आता याच त्याच्या कारनाम्यांमुळे तो प्रचंड अडचणीत आला आहे. जाणून घ्या याबाबत सविस्तरपणे.

हे वाचलं का?

एवढी लग्नं का केली?

54 वर्षीय बिधू प्रकाश स्वैन उर्फ ​​रमेश स्वैन याला साधासुधा नाही तर चक्क लग्न करण्याचा शौक आहे. रमेश हा लग्न करण्यासाठी विविध मॅट्रिमोनियल साइटचा वापर करायचा.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 30 ते 40 वयोगटातील अविवाहित महिलांना टार्गेट करायचा. त्यापैकी बहुतांश घटस्फोटित महिला होत्या. रमेश हा अशा महिलांशी लग्न करुन त्यांचा विश्वास संपादन करायचा. पण नंतर तो त्यांच्याकडूनच पैसे उकळायचा. आरोपी रमेश हा मूळचा ओडिशाच्या केंद्रपारा जिल्ह्यातील असून तो बहुतांश वेळा ओडिशाच्या बाहेरच राहत होता.

त्याच्यात इतकं ‘टॅलेंट’ होतं की तो बरोबर महिलांना आपल्या जाळ्यात अडकवायचा. तो स्वत:ला आरोग्य मंत्रालयाशी संबंधित डॉक्टर म्हणवून घेत असायचा. रमेश आतापर्यंत ओडिशा तसेच पंजाब, दिल्ली आणि झारखंडमधील महिलांनाही आपल्या जाळ्यात ओढलं आहे. अनेक सुशिक्षित महिला देखील रमेशच्या जाळ्यात अडकल्या आहेत. एक महिला वकील देखील रमेशच्या या सगळ्या कटकारस्थानला बळी ठरली होती.

14व्या पत्नीने रमेशचा खरा चेहरा आणला जगासमोर..

पोलिसांनी सांगितले की, आरोपी हा त्याच्या 14व्या पत्नीसोबत ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे राहत होता. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच रमेशच्या 14 व्या पत्नीला कळले की, तिच्या पतीने यापूर्वी 13 लग्ने केली आहेत. यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दाखल केली.

कोणत्याही पत्नीला संशय का आला नाही?

आरोपी रमेश हा खूपच चालाख होता. अतिशय चतुरपणे तो महिलांना आपल्या जाळ्यात ओढायचा. पण तरीही आतापर्यंत त्याच्या एकाही पत्नीला त्याच्याविषयी साधा संशयही आला नव्हता. त्यामुळे त्याची हिंमत अधिकच वाढली होती आणि त्यातूनच त्याने एक-दोन नव्हे तर 14 महिलांची घोर फसवणूक केली.

एक-दोन नव्हे तर तब्बल 8 बायकांसोबत राहतो तरुण, प्रत्येकी सोबत रोमान्स करण्यासाठी वेळही ठरलेली!

भुवनेश्वरचे पोलीस उपायुक्त उमाशंकर दास यांनी सांगितले की, आरोपीने 1982 मध्ये पहिले लग्न केले होते आणि 2002 मध्ये दुसरे लग्न केले होते. या दोन्ही विवाहातून त्यांना 5 मुले झाली. दास म्हणाले की, 2002 ते 2020 दरम्यान त्याने मॅट्रिमोनियल साइटद्वारे इतर महिलांशी मैत्री केली आणि लग्नाचा सपाटाच लावला. पण आता आरोपीची सगळी कृत्य बाहेर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.

    follow whatsapp