कोरोनाच्या डेल्टा या व्हेरिएंटच्या तुलनेत ओमिक्रॉन हा व्हेरिएंट वेगाने पसरतो आहे. असं असलं तरीही विविध अहवाल, अभ्यास यांच्या आधारे हा दावाही करण्यात येतो आहे की डेल्टाच्या तुलनेत ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रूग्णांच्या मृत्यूचं प्रमाण कमी आहे. त्याचप्रमाणे लोकांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचीही फारशी गरज भासत नाही. असं असलं तरीही संसर्गाचा वेग जास्त आहे. त्यामुळे ओमिक्रॉनपासून आपला बचाव झाला पाहिजे ही काळजी प्रत्येकजणच घेताना दिसतो आहे. कारण ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग डेल्टाच्या तुलनेत चौपट वेगाने पसरतो.
ADVERTISEMENT
ओमिक्रॉनच्या लक्षणांमध्ये सुरूवातीला हलका ताप येणं, घशात खवखव जाणवणं, शरीरातल्या स्नायूंमध्ये वेदना होणं, रात्री जास्त प्रमाणात घाम येणं, भूक ना लागणं यांचा समावेश आहे. विविध अभ्यास आणि रिपोर्ट्सद्वारे ही लक्षणं समोर आली आहेत. अशात आता ओमिक्रॉनची आणखी दोन लक्षणं समोर आली आहेत ज्याकडे दुर्लक्ष करू नका असं अभ्यासकांनी सांगितलं आहे.
द सनमध्ये छापून आलेल्या एका अहवालानुसार ओमिक्रॉन व्हेरिएंटची ही नवी लक्षणं आहेत. सर्दीमुळे नाक वाहणं आणि डोकं दुखणं ही दोन लक्षणं दिसली तरीही कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट तुमच्या शरीरात असू शकतो असंही या अहवालात म्हणण्यात आलं आहे. लंडनमधल्या एका विद्यापीठातले प्रोफेसर आयरीन पीटरसन यांनी दिलेल्या माहितीनुसार वाहतं नाक आणि डोकेदुखी ही दोन्ही लक्षणं इतर आजारांमध्येही दिसतात. मात्र हीच लक्षणं कोव्हिडच्या ओमिक्रॉनचीही असू शकतात. त्यामुळे ही लक्षणं दिसली तरीही काळजी घ्या असं आवाहनही करण्यात आलं आहे. सातत्याने ही लक्षणं दिसत असतील तर त्या रूग्णाने कोरोनाची चाचणी केली पाहिजे असंही पीटरसन यांनी म्हटलं आहे.
लहान मुलांसाठी डेल्टापेक्षा जास्त घातक ठरू शकतो ओमिक्रॉन, काय म्हणत आहेत तज्ज्ञ?
काही दिवसांपूर्वीच दक्षिण अफ्रिकेच्या मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. एंजेलिक कोएत्जी यांचं म्हणणं होतं की जो व्यक्ती ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे संक्रमित होतो त्याला तोंडाची चव जाणं, वास जाणं ही आधीची कोरोनाची लक्षणं जाणवत नाहीत. एवढंच नाही तर ओमिक्रॉनचा संसर्ग ज्यांना झाला आहे त्यांना नाक सर्दीमुळे भरल्यासारखं वाटणं, जास्त ताप अशी लक्षणं जाणवातत असंही काही नाही. डेल्टा व्हायरस व्हेरिएंटची ही प्रमुख लक्षणं होती मात्र ओमिक्रॉन संसर्ग आणि डेल्टा संसर्ग यांच्यात फरक असू शकतो असंही कोएत्जी यांनी म्हटलं आहे.
Omicron Symptoms : जर डोळयांमध्ये ही सहा लक्षणं दिसली तर दुर्लक्ष नको, असू शकतो ओमिक्रॉन संसर्ग
ओमिक्रॉनची 20 लक्षणं काय आहेत?
1) डोकेदुखी
2) नाकातून सतत पाणी येणं
3) अशक्तपणा
4) शिंका येणं
5) घशामध्ये खवखवणे
6) सारखा खोकला येणे
7) आवाज कर्कश येणे
8) थंडी जाणवणे
9) ताप
10) चक्कर येणे
11) ब्रेन फॉग (विचार प्रक्रियेची गती मंदावणे)
12) सुगंध बदलणे
13) डोळे जळजळणे
14) नसांमध्ये त्रास होणे
15) भूक न लागणे
16) वास न येणे
17) छातीत वेदना होणे
18) ग्रंथीवर सूज येणे
19) त्वचेला तडे जाणे
20) शक्तीहीन वाटणे
ओमिक्रॉनची लक्षणं किती काळ राहतात?
ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झाल्यानंतर 20 प्रकारची लक्षणं जाणवतात. आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या माहितीनुसार ओमिक्रॉनची लक्षणं डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत पटकन दिसून येतात. त्याचबरोबर ही लक्षणं जाणवण्याचा कालावधी कमी असतो. ओमिक्रॉनचा संसर्ग झाल्यानंतर 2 ते 5 दिवसांनंतर ही लक्षणं जाणवू लागतात. साधारणतः 5 दिवसांपर्यंत ही लक्षणं दिसून येतात.
ADVERTISEMENT