Omicron : ‘देशातल्या 11 राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा शिरकाव, सर्वात जास्त रूग्ण महाराष्ट्रात’

मुंबई तक

• 12:23 PM • 17 Dec 2021

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या 11 राज्यांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. तसंच सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. काय म्हटलं आहे आरोग्य मंत्रालयाने? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल पत्रकारांशी बोलताना म्हणाले […]

Mumbaitak
follow google news

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. देशातल्या 11 राज्यांमध्ये कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. तसंच सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हटलं आहे आरोग्य मंत्रालयाने?

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल पत्रकारांशी बोलताना म्हणाले की WHO ने सांगितल्यानुसार दक्षिण अफ्रिकेत डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही वेगाने ओमिक्रॉन व्हेरिएंट पसरतो आहे. ज्या ठिकाणी समूह संसर्गाची शक्यता असते त्या ठिकाणी डेल्टापेक्षाही जास्त वेगाने ओमिक्रॉनचा प्रसार होऊ शकतो. जगभरात ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरतो आहे.

ओमिक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग झालेल्या रुग्णामध्ये काय लक्षणं दिसतात?

भारतातही ओमिक्रॉनचा संसर्ग होऊ लागला आहे. त्यामुळे गरज नसल्यास प्रवास टाळला पाहिजे. जिथे समूह संसर्गाची म्हणजेच कम्युनिटी ट्रांसमिशनची शक्यता आहे अशा ठिकाणी जाणं टाळा. नव्या वर्षाचा उत्सवही साधेपणाने साजरा करावा. ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या विरोधात लस प्रभावी ठरत नाही असे कोणत्याही संशोधनातून अद्याप समोर आलेलं नाही. त्यामुळे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं.

ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या रूग्णांची सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्रात आहे असंही केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. राजधानी दिल्लीत 22 रूग्ण आहेत. तर राजस्थानमध्ये 17 जणांना ओमिक्रॉन व्हेरिएंटची बाधा झाली आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. दक्षिण अफ्रिकेत मूळ असलेल्या या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा म्हणजेच ओमिक्रॉनचा प्रसार वेगाना होतो आहे. हा विषाणू जलदगतीने पसरत असल्याचंही समोर आलं आहे. या विषाणूच्या प्रकाराची लक्षणं काही प्रमाणात सौम्य असली तरीही प्रसाराचा धोका जास्त आहे असंही लव अग्रवाल म्हणाले.

देशातील 11 राज्यांमधील ओमिक्रॉन रुग्णांची संख्या –

महाराष्ट्र – 32

दिल्ली-22

राजस्थान- 17

कर्नाटक- 8

तेलंगणा- 8

केरळ- 5

गुजरात- 5

पश्चिम बंगाल-1

आंध्र प्रदेश 1

चंदीगढ-1

तामिळनाडू-1

Omicron: ‘ओमिक्रॉन’ व्हेरिएंटचा शोध लावलेल्या शास्त्रज्ञांना धमक्या

दोन दिवसांपूर्वी काय म्हणाले आहेत WHO चे प्रमुख?

कोरोनाचा ओमिक्रॉनचा व्हेरिएंट हा कदाचित आधीपासून लोकांमध्ये असेल पण त्याची माहिती नसावी. हा व्हायरस व्हेरिएंट झपाट्याने पसरतो आहे. ही बाब नक्कीच चिंतेची आहे. ओमिक्रॉनचा प्रभाव फारसा होणार नाही, असं म्हणत म्हणत ओमिक्रॉनला कमी लेखणं ही बाब चिंताजनक आहे असंही गेब्रियेसस यांनी म्हटलं आहे. व्हेरिएंटचा धोका फारसा कमी नाही असं मानलं जातं आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे आजार गंभीर होत नसला तरीही त्यामुळे रूग्णसंख्या वाढली तर आरोग्यसेवेवर ताण येऊ शकतो.

डेल्टा, डेल्टा प्लस आणि इतर व्हेरिएंटच्या तुलनेपेक्षा ओमिक्रॉन व्हेरिएंट वेगाने पसरतो आहे. कोरोनाला रोखायचं असेल तर बूस्टर डोस महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल. पण हा प्रश्न पाथमिकेतचा आहे. यामुळे मृत्यू होत नाही किंवा आजाराचा धोका तसा कमी आहे तरीही अशा व्हेरिएंटसाठी बूस्टर देणं हा महत्त्वाचा उपाय आहे. मात्र ज्या लोकांना लसीचा पहिला डोसच मिळालेला नाही अशा लोकांचं आयुष्य धोक्यात येऊ शकतं. कारण लसपुरवठा कमी झाल्याने अनेकांना अद्याप पहिला डोसही मिळालेला नाही. ज्यांचा पहिला डोसही झाला नाही अशांसाठी हा व्हेरिएंट धोक्याचा ठरू शकतो.

    follow whatsapp