Raigad जिल्ह्यात Corona च्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव, एकाचा मृत्यू

मुंबई तक

• 06:41 AM • 13 Aug 2021

रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. यामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यात दोन रूग्णांना कोरोनाच्या डेल्टा प्लस या विषाणूची लागण झाली. यामध्ये 69 वर्षीय पुरुष आणि 44 वर्षीय महिलेचा समावेश होता. यापैकी 69 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर महिलेवर उपचार सुरू आहे. पुरुष […]

Mumbaitak
follow google news

रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. यामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे. रायगड जिल्ह्यात दोन रूग्णांना कोरोनाच्या डेल्टा प्लस या विषाणूची लागण झाली. यामध्ये 69 वर्षीय पुरुष आणि 44 वर्षीय महिलेचा समावेश होता. यापैकी 69 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर महिलेवर उपचार सुरू आहे. पुरुष रूग्णाच्या मृत्यूनंतर त्याचे स्वॅब टेस्ट डेल्टा प्लस असल्याचं समोर आलं आहे. दोन्ही रूग्णांच्या संपर्कातील 25 जणांचे स्वॅब पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

हे वाचलं का?

आजच मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा बळी गेल्याची घटना समोर आली. त्यापाठोपाठ आता रायगडमध्येही डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. 63 वर्षांची ही महिला कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने ग्रासली होती. ही महिला फुफ्फुसाच्या आजाराने त्रस्त होती त्यामुळे अनेक दिवसांपासून अंथरुणाला खिळली होती. तिच्या घरी ती ऑक्सिजनवर होती. आता या महिलेचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात बुधवारी डेल्टा प्लस व्हेरिएंटचे 20 रूग्ण आढळले. यामध्ये मुंबईत 7, पुणे 3, रायगड, पालघर, नांदेड, गोंदिया या ठिकाणी प्रत्येकी दोन आणि चंद्रपूर आणि अकोला या ठिकाणी प्रत्येकी 1 रूग्णांचा समावेश आहे. त्यामुळे डेल्टा प्लस व्हेरिएंट रूग्णांची संख्या 64 झाली आहे. यापैकी आता रायगड जिल्ह्यात एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंटला केंद्रीय आरोग्य विभागाने व्हेरिएंट ऑफ कन्सर्नच्या श्रेणीत टाकलं आहे.

Variant Of Concern म्हणजे नेमकं काय?

जेव्हा कोणताही व्हायरस हा जास्त प्रमाणात रोग प्रसार वाढवणारा असतो किंवा जास्त प्रमाणात साथ रोगामुळे मृत्यू वाढवणारा असतो तेव्हा त्याला Variant Of Concern असं जाहीर केलं जातं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात आणि महाराष्ट्रात हाहाकार माजवला. कोरोनाची दुसरी लाट देशातून आणि राज्यातून ओसरत असतानाच आता समोर धोका आहे तो डेल्टा प्लसचा. त्याला व्हेरिएंट ऑफ कन्सर्न असं जाहीर करण्यात आलं आहे. म्हणजेच काळजी वाढवणारा व्हेरिएंट किंवा व्हायरसचा प्रकार असं त्याला जाहीर करण्यात आलं आहे. देशात 40 पेक्षा जास्त रूग्ण या व्हेरिएंटचे आढळले आहेत. डेल्टा प्लस व्हेरिएंट हा डेल्टा व्हेरिएंटसारखा नाही. मात्र त्यामुळे मृत्यू वाढू शकतात अशी एक शक्यता वर्तवण्यात आली आहे.

डेल्टा प्लस व्हेरिएंट नेमका काय आहे?

कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटमध्ये आणखी बदल होऊन म्हणजेच म्युटेशन होऊन डेल्टा प्लस हा व्हेरिएंट तयार झाला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये डेल्टा व्हेरिएंटमधे असलेले सगळे म्युटेशन आहेत. तसंच या व्हेरिएंटमध्ये K417N हे म्युटेशनही आढळलं आहे. भारतात सगळ्यात आधी आढळलेल्या डेल्टा व्हेरिएंटचं शास्त्रीय नाव B.1.617.2 असं आहे. तर आता म्युटेट झालेल्या म्हणजेच बदल झालेल्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचं नाव हे B.1.617.2.1 असं आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी दिलेली माहिती अशी ‘कोरोना संसर्गाची दसरी लाट अधिक झपाट्याने पसरण्यासाठी डेल्टा व्हेरिएंट कारणीभूत होता. यात आणखी एक म्युटेशन झालं आहे. याला डेल्टा प्लस असं नाव देण्यात आलं आहे.’

    follow whatsapp